X
राष्ट्रीय

CJP Protest : पोलीस कारवाई योग्यच- जे. पी. नड्डा

संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान राज्यसभेत बुधवारी झालेल्या गदारोळात केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी विद्यार्थी आंदोलकांवरील पोलीस कारवाईचे समर्थन केले. काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी आणीबाणीच्या काळातील स्वतःच्या अटकेची आठवण करून दिली.

Swapnil S

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान राज्यसभेत बुधवारी झालेल्या गदारोळात केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी विद्यार्थी आंदोलकांवरील पोलीस कारवाईचे समर्थन केले. काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी आणीबाणीच्या काळातील स्वतःच्या अटकेची आठवण करून दिली.

जेएनयूचे विद्यार्थी नेते आईशे घोष यांना अटक करण्यासाठी काही साध्या कपड्यातले पोलीस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मुख्यालयात गेले होते. त्यावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. याबाबत नड्डा म्हणाले, " हा एक कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या प्रक्रियेतला सामान्य भाग आहे. मी स्वतः विद्यार्थी कार्यकर्ता होतो. काँग्रेसच्या राजवटीतील आणीबाणीच्या काळात मला वर्गातून अनेक वेळा त्यांनी पुढे सांगितले की, आंदोलन करणाऱ्यांनी कायदा स्वतःच्या हाती घेतल्यास त्याचे परिणाम भोगण्याची तयारी ठेवली पाहिजे. "ही सामान्य परिस्थिती आहे. विद्यार्थी कार्यकर्त्यांनी अशा प्रसंगांना सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. जे कायदा आणि सुव्यवस्था स्वतःच्या हाती घेतात, त्यांच्यावर पोलिसांना कारवाई करावी लागते आणि संबंधित प्रकरणांमध्ये पोलिसांनी त्यानुसार कारवाई केली आहे," असे नड्डा म्हणाले.

सीजेपीकडून नड्डा यांच्या वक्तव्यावर टीका

नड्डा यांच्या वक्तव्यानंतर 'कॉकरोच जनता पार्टी' (सीजेपी) ने केंद्र सरकारवर टीका केली. पक्षाचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी 'एक्स'वरील पोस्टमध्ये म्हटले, "म्हणजे गेल्या ५० वर्षांत देशाने अजिबात प्रगती केलेली नाही, असेच तुम्हाला म्हणायचे आहे का?"

सीजेपीने असा दावा केला की, सध्याच्या पोलीस कारवाईची तुलना आणीबाणीतील अटकांशी करणे म्हणजे गेल्या पाच दशकांत मतभेद आणि आंदोलन हाताळण्याच्या पद्धतीत कोणतीही सुधारणा झालेली नसल्याची अप्रत्यक्ष कबुली देण्यासारखे आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग