राष्ट्रीय

Viral Video : भरगच्च ट्रेनमध्ये सीट न मिळाल्याने 'जुगाड' केला; पण, सर्वांसमोर इज्जतीचा पालापाचोळा झाला

हा तरुण जनरल डब्यातील पंख्यावर पहिले आपल्या बूटांसाठी जागा करतो. नंतर वरच्या दोन सीटच्या मध्ये तो चादर बांधतो आणि एका सीटवर उभा राहून कसाबसा चादरीत बसायला जातो.

Swapnil S

भारत आणि 'जुगाड' हे वेगळंच नातं आहे. इथे प्रत्येक गल्लीत असे लोक सापडतात जे आपल्या युक्तीने महान अभियंते आणि शास्त्रज्ञांनाही आश्चर्यचकित करू शकतात. कोणी खाटीचे रुपांतर मोटरकारमध्ये करतो, तर कोणी बाटल्यांच्या झाकणांद्वारे दरवाजाचे कुलूप बनवतो. अशी अनेक उदाहरणे तुम्हाला सोशल मीडियावर पाहायला मिळतील. या उदाहरणांवरून प्रेरित होऊन एका माणसाने ट्रेनमध्ये स्वत:साठी सीटची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला पण सर्वांसमोर त्याची फजिती झाली.

प्रवाशांनी भरगच्च ट्रेनमध्ये बसण्यासाठी सीट नसल्यामुळे एक तरुण शक्कल लढवतो. जनरल डब्यातील पंख्यावर तो पहिले आपल्या बूटांसाठी जागा करतो. नंतर वरच्या दोन सीटच्या मध्ये तो चादर बांधतो आणि एका सीटवर उभा राहून कसाबसा चादरीत बसायला जातो. पण, त्या चादरीत तो बसतो न बसतो तोच पुढच्याच क्षणाला चादरीची गाठ सुटते आणि तो धाडकन खाली बसलेल्या प्रवाशांवर कोसळतो. हे दृष्य बघून ट्रेनमधील इतर प्रवासी हसून हसून लोटपोट होतात.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून नेटकरी मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. यासोबतच, लोकसंख्या वाढत असताना ट्रेनची संख्या वाढवली नाही की जनरल डब्यांची संख्या वाढवली नाही, देशातील बहुतांश भागांमध्ये हिच परिस्थिती आहे, असे म्हणत चिंताही व्यक्त करीत आहेत.

मराठवाड्यात संततधार पाऊस; गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत

"हास्यास्पद नाटकं करून सत्य लपवता येत नाही"; संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानवर भारताचा घणाघात

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याचा इशारा

गायक झुबीन गर्ग मृत्यू प्रकरण : आयोजक व मॅनेजरवर लुकआउट नोटीस जारी; मुख्यमंत्री सरमा म्हणाले, अन्यथा...

MPSC ची राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली