'के-४' बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; पाणबुडीतून ३,५०० किमी मारक क्षमता Photo : X (@IndianTechGuide)
राष्ट्रीय

'के-४' बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; पाणबुडीतून ३,५०० किमी मारक क्षमता

भारताने बंगालच्या उपसागरात अण्वस्त्र पाणबुडी आयएनएस अरिघातवरून ‘के-४’ बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची गुरुवारी चाचणी यशस्वी केली. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ३५०० किमी आहे.

Swapnil S

विशाखापट्टणम : भारताने बंगालच्या उपसागरात अण्वस्त्र पाणबुडी आयएनएस अरिघातवरून ‘के-४’ बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची गुरुवारी चाचणी यशस्वी केली. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ३५०० किमी आहे.

संरक्षण सूत्रांच्या माहितीनुसार, ही चाचणी विशाखापट्टणम येथील किनाऱ्यावर करण्यात आली. भारत जमीन, हवा व समुद्रातूनही अण्वस्त्र डागू शकतो. हे क्षेपणास्त्र २ टन अण्वस्त्र वाहून नेऊ शकते. ‘के’ मालिकेतील क्षेपणास्त्रातील ‘के’ अक्षर हे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या सन्मानार्थ ठेवले आहे. ‘के-४’ हे क्षेपणास्त्र जमिनीवरून मारा करणारे ‘अग्नि’ मालिकेतील आधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणा आहे. पाणबुडीतून मारा करण्यासाठी त्याला बनवले आहे. हे क्षेपणास्त्र पहिल्यांदा समुद्रातून बाहेर येते.

त्यानंतर ते आपल्या लक्ष्यावर तुटून पडते. हे क्षेपणास्त्र अरिहंत श्रेणीतील पाणबुडीवरून डागले जाऊ शकते. ‘के-४’ या क्षेपणास्त्राची चाचणी महत्त्वाची आहे. कारण यामुळे भारताची मारक क्षमता अधिक विकसित होते. आपल्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले जाऊ शकते, असा मानसिक दबाव संभाव्य शत्रूवर येतो.

या क्षेपणास्त्राची चाचणी विशाखापट्टणम येथील किनारपट्टीवरून करण्यात आली. यासाठी ‘आयएनएस अरिघात’ या पाणबुडीचा वापर करण्यात आला. या चाचणीनंतर सर्व तांत्रिक निकष व मिशनचे तपशीलवार विश्लेषण केले जाईल.

लिबर्टी शोरूमने तुटलेल्या चप्पलीची वॉरंटी नाकारली; वाद थेट कोर्टात, मॅनेजरला होणार अटक

रानडुक्कराचा वन विभागाच्या पथकावर हल्ला; अधिकारी गंभीर जखमी; Video व्हायरल

'तो स्पष्ट नाराज दिसतोय!'; एपी ढिल्लोंने ताराला Kiss केल्यानंतर वीर पहारियाची प्रतिक्रिया व्हायरल | Video

Mumbai : ChatGPT वापरून बनवला लोकल ट्रेनचा बनावट पास; भन्नाट आयडिया तरुणाच्या अंगलट

बांगलादेशात पुन्हा हिंसाचार : प्रसिद्ध रॉकस्टार जेम्सच्या कॉन्सर्टवर हल्ला; तस्लीमा नसरीन यांची संतप्त प्रतिक्रिया, "जिहादींनी जेम्सला...