इन्फोसिसचे संस्थापक आहेत म्हणून त्यांना सगळे माहीत आहे का? सुधा आणि नारायण मूर्तीवर संतापले कर्नाटकचे मुख्यमंत्री 
राष्ट्रीय

इन्फोसिसचे संस्थापक आहेत म्हणून त्यांना सगळे माहीत आहे का? सुधा आणि नारायण मूर्तीवर संतापले कर्नाटकचे मुख्यमंत्री

कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या सामाजिक, शैक्षणिक सर्वेक्षणात सहभागी न होण्याचा निर्णय जाहीर करणारे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि त्यांची पत्नी सुधा मूर्ती यांच्यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जोरदार टीका केली.

Swapnil S

बंगळुरू : कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या सामाजिक, शैक्षणिक सर्वेक्षणात सहभागी न होण्याचा निर्णय जाहीर करणारे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि त्यांची पत्नी सुधा मूर्ती यांच्यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जोरदार टीका केली. नारायण मूर्ती इन्फोसिसचे संस्थापक आहेत म्हणून त्यांना सर्व माहिती आहे का, आम्ही अनेकदा सांगितले आहे की, हे मागासवर्गीयांचे सर्वेक्षण नाही, हे संपूर्ण लोकसंख्येचे सर्वेक्षण आहे, असे सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही अनेक वेळा स्पष्ट केले आहे, सिद्धरामय्या म्हणाले. त्यानंतरही सुधा आणि नारायण मूर्ती यांना वाटते की हे मागासवर्गीयांचे सर्वेक्षण आहे तर हे चुकीचे आहे. केंद्र सरकारही सर्व्हे करत आहे. तेव्हा ते काय करतील, कदाचित त्यांच्याकडे चुकीची माहिती आहे. हे मागासवर्गाचे सर्वेक्षण नाही, त्यांना जर हे समजले नसेल, तर मी काय करू शकतो, असे

सर्वेक्षण करणारे जेव्हा त्यांच्या घरी गेले तेव्हा या जोडप्याने सांगितले की, ते कोणत्याही मागासवर्गीय समुदायाचे नाहीत आणि त्यामुळे अशा गटांसाठी असलेल्या कोणत्याही सरकारी सर्वेक्षणात ते सहभागी होणार नाहीत.

अयोध्येत २९ लाख दिव्यांची विक्रमी आरास! ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद

केंद्राकडून महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना १,५६६ कोटींची मदत; कर्नाटकलाही ३८४ कोटींचा निधी जाहीर

'मविआ'चा एल्गार; EC विरोधात १ नोव्हेंबरला विराट मोर्चा; एक कोटी घुसखोर मतदार कमी करा! केंद्रीय गृहमंत्र्यांना विरोधकांचे आवाहन

गृह मंत्रालयाशी चर्चा करायला लडाखचे शिष्टमंडळ तयार; येत्या बुधवारी दिल्लीत बैठकीचे आयोजन

महाराष्ट्रात ९६ लाख बोगस मतदार; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल