Karnataka : शिवकुमार गटाचा जल्लोष; पण बदलाची घोषणा नाही (संग्रहित छायाचित्र)
राष्ट्रीय

Karnataka : शिवकुमार गटाचा जल्लोष; पण बदलाची घोषणा नाही

कर्नाटकमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली नेतृत्वबदलाची चर्चा आता अंतिम टप्प्यात आली असल्याचे संकेत मिळत आहेत.

Swapnil S

बेंगळुरू : कर्नाटकमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली नेतृत्वबदलाची चर्चा आता अंतिम टप्प्यात आली असल्याचे संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या गुरुवारी पदाचा राजीनामा देणार असून उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडे राज्याच्या नेतृत्वाची धुरा सोपविण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. काँग्रेसचे राज्य प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले असले तरी शिवकुमार यांच्या समर्थकांनी राज्यात अनेक ठिकाणी अगोदरच जल्लोष साजरा केला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यपालांकडे भेटीची वेळ मागितली आहे, तसेच गुरुवारी त्यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसाठी एका विशेष न्याहारी (ब्रेकफास्ट) बैठकीचे आयोजन केले आहे. त्यामुळे या चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेस हायकमांडने सिद्धरामय्या यांना केंद्रात महत्त्वाची भूमिका आणि राज्यसभेची जागा देऊ करत मुख्यमंत्री पद सोडण्यास सांगितल्याचे वृत्त आहे, मात्र सिद्धरामय्या यांनी ही ऑफर तातडीने स्वीकारलेली नाही, असे बोलले जात आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (जे स्वतः कन्नडिगा आहेत) आणि राहुल गांधी (ज्यांचे कर्नाटकच्या जनतेवर अतोनात प्रेम आहे) जे काही निर्णय घेतील, ते व्यक्तीहिताचे नसून संपूर्ण कर्नाटक राज्याच्या कल्याणाचे असतील, असे सांगून सुरजेवाला हे सारवासारव करण्याचा प्रयत्न करीत असले तरी गुरुवारी राज्यात नेतृत्वबदल अटळ आहे, अशी चर्चा आहे.

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग