प्रातिनिधिक छायाचित्र  
राष्ट्रीय

कर्नाटकात 'मतचोरी'; SIT चे आरोपपत्र दाखल

कर्नाटकातील २०२३ च्या विधानसभा निवडणुकांदरम्यान आळंद विधानसभा मतदारसंघातील कथित 'मतचोरी' प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) माजी भाजप आमदार, त्यांचा मुलगा आणि त्यांच्या निकटवर्तीयासह एकूण सात जणांची नावे असलेले आरोपपत्र दाखल केले आहे.

Swapnil S

बेंगळुरू : कर्नाटकातील २०२३ च्या विधानसभा निवडणुकांदरम्यान आळंद विधानसभा मतदारसंघातील कथित 'मतचोरी' प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) माजी भाजप आमदार, त्यांचा मुलगा आणि त्यांच्या निकटवर्तीयासह एकूण सात जणांची नावे असलेले आरोपपत्र दाखल केले आहे.

बेंगळुरू येथील प्रथम अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात एसआयटीने दाखल केलेल्या या आरोपपत्रात ५,९९४ मतदारांची नावे यादीतून काढून टाकण्याच्या कथित प्रयत्नांचा उल्लेख आहे. सीआयडीतील सूत्रांच्या माहितीनुसार, सुमारे २२ हजार पानांचे हे आरोपपत्र असून मतदारांची नावे कशी हटवली गेली याची कार्यपद्धती सविस्तरपणे स्पष्ट करण्यात आली आहे.

आळंदचे चार वेळा आमदार राहिलेले सुभाष गुट्टेदार, त्यांचा मुलगा हर्षानंद गुट्टेदार, त्यांचे वैयक्तिक सचिव टिप्पेरुद्र, कलबुर्गीतील तीन डेटा सेंटर ऑपरेटर अक्रम पाशा, मुकरम पाशा आणि मोहम्मद अशफाक तसेच पश्चिम बंगालमधील बापी आद्या यांचा समावेश आहे.

आद्या हा या प्रकरणात अटक होणारा पहिला व्यक्ती होता. तो 'ओटीपी बाझार' नावाची वेबसाइट चालवत होता. जी अमेरिकेतील एका प्लॅटफॉर्मशी जोडलेली असून 'ओटीपी बायपास' सुविधा पुरवत असल्याचा आरोप आहे. नंतर त्याला जामिनावर मुक्त करण्यात आले.

इंडोनेशियात ६.७ तीव्रतेचा भूकंप; इमारतींचे नुकसान, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, Video

NEET UG 2026 Re-Exam : टेलिग्रामवर २२ जूनपर्यंत बंदी; परीक्षेआधी NTA चा मोठा निर्णय

जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसचे ५५ टक्के काम पूर्ण; ७६.४८ कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे जानेवारी २०२७ पर्यंत लोकार्पण होण्याची शक्यता

Mumbai : वांद्रेतील मेट्रो २बीच्या बांधकामस्थळी आग; जळते अवशेष रस्त्यावर पडल्याचा व्हिडीओ व्हायरल, MMRDA चे स्पष्टीकरण

Kalyan : मोठागाव रेल्वे उड्डाणपुलासाठी निविदा जारी; २४ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट