राष्ट्रीय

कार्ती चिदंबरम यांच्या सहकाऱ्याला सीबीआयने केली अटक

वृत्तसंस्था

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांचा निकटवर्तीय भास्कर रमण याला सीबीआयने अटक केली आहे. व्हिसा भ्रष्टाचारप्रकरणी ही अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येते. याच प्रकरणात सीबीआयने कार्ती चिदंबरम यांच्या घर आणि कार्यालयावरही छापे टाकले होते.

सीबीआयने नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार हे प्रकरण २०११ चे आहे. पी चिदंबरम त्यावेळी गृहमंत्री होते. शेडोंग इलेक्ट्रिक पॉवर कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन (सेप्को) या चिनी कंपनीला पंजाबमधील मानसा येथे पॉवर प्लान्ट बांधण्यासाठी तलवंडी साबो पॉवर लिमिटेडकडून कंत्राट मिळाले होते. पॉवर प्लान्टच्या बांधकामात होणारा विलंब आणि वेळेवर काम पूर्ण न केल्याने मोठा दंड टाळण्यासाठी अतिरिक्त चिनी तज्ज्ञ आणण्याची सेप्कोला नितांत गरज होती. परंतु, गृह मंत्रालयाने मर्यादित संख्येने व्हिसा जारी केल्यामुळे सेप्को तज्ज्ञ आणू शकले नाही.

सीबीआयच्या म्हणण्यानुसार, टीएसपीएलचे उपाध्यक्ष विकास मखरिया यांनी पी चिदंबरम यांचे निकटवर्तीय भास्कर रमन यांच्याशी याबाबत संपर्क साधला. भास्कर रमन यांनी ५० लाखांच्या मोबदल्यात काम करून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर चिनी कंपनीच्या २६३ तज्ज्ञांच्या व्हिसाची मुदत वाढवण्यात आली. यानंतर मुंबईतील बेल टूल्स लिमिटेड या कंपनीला बनावट पावत्यांद्वारे ५० लाख रुपये पाठवण्यात आले आणि तेथून ही रक्कम भास्कर रमन आणि कार्ती चिदंबरम यांच्यापर्यंत पोहोचली. कार्ती चिदंबरम यांच्या विरोधात भक्कम इलेक्ट्रॉनिक आणि इतर पुरावे असल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक