श्रीनगर : काश्मीर खोऱ्यात दहशतवादी नेटवर्कविरोधात सुरू असलेल्या कारवाईचा भाग म्हणून ‘काऊंटर इंटेलिजन्स काश्मीर’ने (सीआयके) रविवारी विविध ठिकाणी छापे टाकून एका महिलेसह नऊ जणांना ताब्यात घेतले.
विश्वसनीय गुप्त माहितीच्या आधारे तरुणांच्या अतिरेकी हालचालींवर लक्ष ठेवून श्रीनगर, कुलगाम, बारामुला, शोपियां आणि पुलवामा या जिल्ह्यांतील १० ठिकाणी एकाचवेळी छापे टाकण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या धाडसत्रात एका महिलेसह एकूण नऊ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. “सिम कार्ड, मोबाईल फोन, टॅब्लेट तसेच विविध डिजिटल उपकरणांसह मोठ्या प्रमाणावर संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले असून त्याचे फॉरेन्सिक परीक्षण केले जाणार आहे.