Weather Update : केरळात मान्सूनपूर्व सरी प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

Weather Update : केरळात मान्सूनपूर्व सरी

केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाचे संकेत मिळत असतानाच, शनिवारी राज्याच्या विविध भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली.

Swapnil S

तिरुवनंतपुरम : केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाचे संकेत मिळत असतानाच, शनिवारी राज्याच्या विविध भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने संध्याकाळच्या वेळेसाठी राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे.

हवामान विभागाने दुपारी ४ वाजल्यापासून पुढील तीन तासांसाठी त्रिशूर, कोल्लम, कोट्टायम आणि इडुक्की या जिल्ह्यांमध्ये हा 'आँरेंज अलर्ट' दिला आहे. 'ऑरेंज अलर्ट' म्हणजे या भागात ११ सेमी ते २० सेमी दरम्यान अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या चार जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

यापूर्वी मे २०२४ आणि मे २०२० मध्ये रात्रीचे तापमान २९.५ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले होते. कुलाबा केंद्रात किमान तापमान २८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्य आहे. मात्र, दिवसाचे तापमान अजूनही सरासरीपेक्षा जास्त असून, सांताक्रूझमध्ये ३५.१ अंश (सामान्यपेक्षा २.७ अंश जास्त) आणि कुलाबामध्ये ३४.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. कुलाबा येथे ९१ टक्के आणि सांताक्रूझ येथे ७४ टक्के आर्द्रता (दमटपणा) असल्याने मुंबईकरांना उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागला.

भारतीय हवामान विभागाने रविवारी मुंबई आणि ठाण्यात हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मात्र, हवामान तज्ज्ञांच्या मते, हा दिलासा तात्पुरता असून २५ ते २७ मे दरम्यान पुन्हा कोरडे हवामान राहणार आहे.

Mumbai : विजेच्या मागणीचा उच्चांक; द. मुंबईत वारंवार बत्ती गुल, गिरगाव, दादर, वडाळ्यात नागरिक हैराण

भारत सर्वात मोठा शस्त्र निर्यातदार होईल - राजनाथ सिंह

दरवाढीचा तिसरा दणका; पेट्रोल, डिझेल, CNG पुन्हा महाग, दहा दिवसांत तब्बल ५ रुपयांनी महागले

'झुरळां'ची गळचेपी; कॉकरोच जनता पार्टीचे अकाऊंटस ब्लॉक

Bakri Eid 2026 : गोमांस विक्री केल्यास मोक्का लावण्याचा इशारा