राष्ट्रीय

अज्ञात वाहनाच्या धडकेत मायलेक ठार, पती व दुसरा मुलगा गंभीर

जखमींना वैद्यकीय सेवेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

Swapnil S

बिजनौर : या जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी एका वाहनाने धडक दिल्याने एक महिला आणि तिचा एक वर्षाचा मुलगा जागीच ठार झाला, तर तिचा पती आणि दुसरा मुलगा गंभीर जखमी झाला. मंडवार स्टेशन हाऊसचे पोलीस अधिकारी (एसएचओ) रवी तोमर म्हणाले, धर्मेंद्र आणि त्यांची पत्नी सुनीता आणि त्यांची मुले टिंकू (१२) आणि मुकुल (७) रेल्वे स्टेशनवर जात असताना फुलवारी लॉनजवळ त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. सुनीता आणि मुकुल यांचा जागीच मृत्यू झाला, तर धर्मेंद्र आणि टिंकू गंभीर जखमी झाले. जखमींना वैद्यकीय सेवेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

Mumbai : तयार फराळाला महागाईची फोडणी; दरांमध्ये झाली ३० ते ४० टक्क्यांनी वाढ, ग्राहकांच्या खिशाला कात्री

इंडिया आघाडीचा ‘सार्वजनिक महाभियोग’ कार्यक्रम आज

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण : जखमी चालक, ब्लॉगरला रुग्णालयातून डिस्चार्ज

FDA तील चार अधिकारी निलंबित; कारवाई करताना अनियमितता, २१ जणांविरुद्ध विभागीय चौकशी

६ राज्यांत SIR च्या मुदतीत वाढ; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय