कोलकाता डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणात मुख्य आरोपी संजय रॉय दोषी 
राष्ट्रीय

कोलकाता डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणात मुख्य आरोपी संजय रॉय दोषी

येत्या सोमवारी न्यायालय रॉयला शिक्षा सुनावणार आहे. न्या. अनिर्बन दास यांनी हे प्रकरण सुनावणीस घेतल्यानंतर ५७ दिवसांनी निर्णय सुनावला आहे.

Swapnil S

कोलकाता : कोलकाताच्या आर. जी. कर महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी सियालदह सत्र न्यायालयाने शनिवारी मुख्य आरोपी संजय रॉयला दोषी ठरविले. येत्या सोमवारी न्यायालय रॉयला शिक्षा सुनावणार आहे. न्या. अनिर्बन दास यांनी हे प्रकरण सुनावणीस घेतल्यानंतर ५७ दिवसांनी निर्णय सुनावला आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात कोलकातामध्ये सदर घटना घडल्यानंतर देशभरात त्याचे निषेधात्मक पडसाद उमटले. कोलकाता पोलिसांचा नागरी स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या संजय रॉयने गुन्हा केल्यानंतर त्याला दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आली होती. सुनावणी झाल्यानंतर न्यायाधीशांनी शनिवारी सांगितले की, आम्ही सर्व पुरावे आणि साक्षीदार तपासले आहेत. तसेच वकिलांचा युक्तिवादही ऐकला. या सर्वांच्या आधारे आरोपी दोषी असल्याचे सिद्ध होते. त्यामुळे त्याला शिक्षा झालीच पाहिजे.

सत्र न्यायालयात सुनावणीदरम्यान आरोपी संजय रॉयने म्हणाला की, ज्यांनी मला फसवले त्यांना का सोडले जात आहे. यावर न्यायाधीशांनी सोमवारी त्याच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकणार असल्याचे सांगितले. तोपर्यंत संजय रॉयची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. संजय रॉयचा इशारा आर. जी. कर महाविद्यालयाचे प्राचार्य संदीप घोष यांच्याकडे होता. ज्यांना पुराव्यात फेरफार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. मात्र कालांतराने त्यांना जामिनावर सोडण्यात आले.

अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अनिर्बान दास यांच्या न्यायालयात खटला सुरू झाल्यानंतर ५७ दिवसांनी हा निकाल देण्यात आला. या प्रकरणाची सुनावणी ११ नोव्हेंबर रोजी सुरू झाली. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार घटनेचा तपास करणाऱ्या सीबीआयने या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले होते. गेल्या वर्षी ९ ऑगस्ट रोजी आर. जी. कर रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागाच्या चौथ्या मजल्यावरील सेमिनार हॉलमधून पीडितेचा मृतदेह आढळून आला होता. घटनेच्या दुसऱ्याच दिवशी मुख्य आरोपी, नागरी स्वयंसेवक संजय राय याला अटक करण्यात आली होती.

संजय रॉय एकटाच गुन्हेगार

स्वयंसेवक संजय रॉय हा गुन्हेगार होता. अनेक भौतिक पुरावे, परिस्थितीजन्य पुरावे आणि फॉरेन्सिक अहवालांच्या आधारे, संजयने हा गुन्हा एकट्यानेच केल्याचे सिद्ध होते. ९ ऑगस्ट रोजी गुन्ह्याच्या ठिकाणी सापडलेला एक छोटासा केस फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचेही आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. अहवालात हा केस संजय रॉय याचा असल्याचे म्हटले आहे. घटनेच्या २४ तासांच्या आत कोलकाता पोलिसांनी त्याला अटक केली.

ज्ञानेशविरोधात आंदोलनाचा भडका; CJP नेत्यांची विमानातच धरपकड; दिल्लीत ७,००० जण ताब्यात; ..तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार!

ज्ञानेशसह हे सरकारही जाईल - राहुल गांधी

Mumbai : तुषार गांधींसाठी ठाकरे गटाचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या; आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह शिवसैनिकांची धाव

Mumbai : पदार्थांच्या पौष्टिकतेची माहिती मिळणार; FDA च्या कारवाईनंतर पालिका कॅन्टीनचा निर्णय

मला नोबेल मिळायला हवा होता; डोनाल्ड ट्रम्प यांचा नॉर्वेवर संताप; ८ युद्धे सोडवल्याचा केला दावा