राष्ट्रीय

कोलकाता रेप-हत्या प्रकरण : मृत्युदंडाची मागणी करणारी सीबीआयची याचिका मंजूर

कोलकाता हायकोर्टात शुक्रवारी आर. जी. कर रुग्णालय बलात्कार-हत्या प्रकरणाशी संबंधित खटल्याची सुनावणी झाली.

Swapnil S

कोलकाता : कोलकाता हायकोर्टात शुक्रवारी आर. जी. कर रुग्णालय बलात्कार-हत्या प्रकरणाशी संबंधित खटल्याची सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारची याचिका फेटाळून लावली आणि सीबीआयची याचिका स्वीकारली.

कनिष्ठ न्यायालयाने दोषी संजय रॉयला दिलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेला दोघांनीही आव्हान दिले होते. दोन्ही याचिकांमध्ये संजयला मृत्युदंडाची मागणी करण्यात आली होती. न्या. देबांग्सु बसक आणि मोहम्मद सब्बर रशिदी यांच्या खंडपीठाने बंगाल सरकारला सांगितले की, राज्य सरकारला मृत्युदंडाची मागणी करण्याचा कोणताही अधिकार नाही. न्यायालयाने सीबीआयच्या बाजूने निकाल देत म्हटले की, तीच खटला चालवणारी संस्था असल्याने तिला शिक्षेला आव्हान देण्याचा अधिकार आहे.

सियालदाह न्यायालयाने २० जानेवारी रोजी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. याप्रकरणी २७ जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीनंतर कोलकाता उच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता.

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

आज विजयी मेळावा; उद्धव-राज ठाकरे वरळीत एकाच मंचावर येणार

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश

मथुरेची शाही ईदगाह मशीद वादग्रस्त संरचना नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदू पक्षाची याचिका फेटाळली