कोलकात्यात बांधकामाधीन गोदामाचे छत कोसळले; ३ ठार, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, Video 
राष्ट्रीय

कोलकात्यात बांधकामाधीन गोदामाचे छत कोसळले; ३ ठार, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, Video

कोलकात्यातील तारतला परिसरात बांधकाम सुरू असलेले तीन मजली गोदाम कोसळले असून अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे.

Mayuri Gawade

कोलकाता येथील तारातला परिसरात बुधवारी (दि. २४) दुपारी तीन मजली बांधकाम सुरू असलेल्या गोदामाचे छत अचानक कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. काही माध्यमांच्या प्राथमिक वृत्तांनुसार या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही. ढिगाऱ्याखाली काही मजूर अडकले असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून आतापर्यंत १३ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, ही घटना ट्रान्सपोर्ट डेपो रोड परिसरात घडली. गोदामाचे आरसीसी बांधकाम सुरू होते. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याचे काम पूर्ण झाले होते. मात्र कास्टिंगचे काम सुरू असतानाच अचानक छत कोसळले. दरम्यान मोठा आवाज झाला आणि परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. काही वेळातच मोठी गर्दी झाली. प्रत्यक्षदर्शींनी ढिगाऱ्याखालून मदतीसाठी ओरडण्याचे आवाज ऐकू आल्याचे सांगितले.

बचावकार्य युद्धपातळीवर

घटनेची माहिती मिळताच कोलकाता पोलीस, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि नागरी संरक्षण दल घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य वेगाने सुरू करण्यात आले. ढिगारा हटवण्यासाठी क्रेन, गॅस कटर आणि जड यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला असून काही ठिकाणी लोखंडी बीम कापून मार्ग तयार केला जात आहे. एनडीआरएफ पथकाने स्निफर डॉग्स आणि ड्रोनच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली.

१३ जणांना वाचवण्यात यश

पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आतापर्यंत १३ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे. त्यापैकी काही जखमींना एसएसकेएम रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे.

काही जण अडकले असल्याची शक्यता

अजूनही काही मजूर ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे बचावकार्य सुरूच ठेवण्यात आले आहे.

चौकशी सुरू

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, कास्टिंगचे काम सुरू असताना छत कोसळले. तसेच बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी या दुर्घटनेच्या कारणांचा तपास सुरू केला असून बांधकामात काही त्रुटी होत्या का, याचाही शोध घेतला जात आहे.

Mumbai : महापौरांसमोरच मॅनहोलमध्ये पडला सफाई कर्मचारी; अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा, Video

'सत्य सांगणं इतकं कठीण झालंय का?' केतन अग्रवाल प्रकरणावर हिना खानची प्रतिक्रिया; म्हणाली, "त्याचा जीव वाचला असता...

प्रियकरासोबत पळून गेल्यास कुटुंबाची बदनामी झाली असती; मग होणाऱ्या नवऱ्यालाच दरीत ढकललं, केतन अग्रवाल प्रकरणात नवी माहिती

Mumbai : मुसळधार पावसात धावत्या लोकलमध्ये क्षुल्लक वाद विकोपाला; २२ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या, आरोपी फरार

Navi Mumbai : पाडकाम रोखण्यासाठी कोर्टाचा बनावट आदेश बनवला; न्यायाधीशांचीच केली हुबेहूब खोटी सही, CBD पोलिसांत गुन्हा दाखल