श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या कुलगाम येथील अखल जंगलात सुरक्षा दलांनी शनिवारी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या दोघांचेही मृतदेह सापडले आहेत. यापैकी एका दहशतवाद्याचे नाव हारिस नजीर डार असून तो पुलवामाचा राहणारा आहे, तर दुसऱ्याचे नाव अजूनही समोर आले नाही.
हारिस डार हा शनिवारी सकाळी, तर दुसरा दहशतवादी दुपारी मारला गेला. हारिस हा 'सी' श्रेणीतील दहशतवादी होता. पहलगाम हल्ल्यानंतर गुप्तचर खात्याने १४ स्थानिक दहशतवाद्यांची यादी जारी केली. त्यात हारिसचे नाव होते. त्याच्याकडे 'एके-४७' रायफल, मॅगेझीन, ग्रेनेड, दारुगोळा जप्त केला आहे.
कुलगाममध्ये सुरक्षा दल व दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी रात्रीपासून चकमक सुरू झाली. 'ऑपरेशन अखल' मध्ये विशेष पथक, जम्मू-काश्मीर पोलीस, लष्कर व सीआरपीएफ आदी सहभागी झाले. हारिसचे नाव होते. त्याच्याकडे 'एके-४७' रायफल, मॅगेझीन, ग्रेनेड, दारुगोळा जप्त केला आहे. कुलगाममध्ये सुरक्षा दल व दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी रात्रीपासून चकमक सुरू झाली. 'ऑपरेशन अखल' मध्ये विशेष पथक, जम्मू-काश्मीर पोलीस, लष्कर व सीआरपीएफ आदी सहभागी झाले.