एक्स
राष्ट्रीय

‘फेंगल’मुळे तामिळनाडूत भूस्खलन; ७ जण बेपत्ता

‘फेंगल’ चक्रीवादळामुळे सोमवारी केरळ, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात मुसळधार पाऊस पडत आहे. या चक्रीवादळामुळे तामिळनाडूच्या तिरुवन्नामलाई येथे भूस्खलन झाले. यात अनेक घरे दबली गेली असून, सात जण बेपत्ता झाले आहेत. ‘एनडीआरएफ’कडून ढिगारे हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Swapnil S

चेन्नई : ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे सोमवारी केरळ, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात मुसळधार पाऊस पडत आहे. या चक्रीवादळामुळे तामिळनाडूच्या तिरुवन्नामलाई येथे भूस्खलन झाले. यात अनेक घरे दबली गेली असून, सात जण बेपत्ता झाले आहेत. ‘एनडीआरएफ’कडून ढिगारे हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

‘फेंगल’मुळे झालेल्या मुसळधार पावसात तीन जणांचा बळी गेला आहे. पुद्दुचेरी जिल्ह्यात २४ तासांत ४९ सेमी पाऊस पडला. या पावसाने २० वर्षांचा विक्रम मोडीत काढला आहे. सखल भागात पाणी शिरले. लष्कराने २०० जणांना सुरक्षित ठिकाणी नेले.

पुरामुळे वाहने वाहून गेली

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे तमिळनाडूतील कृष्णागिरी जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. याचा मोठा फटका उथंगराई तालुक्याला बसला. उथंगराई बस स्टँडमध्ये पुराचे पाणी घुसले. त्यामुळे उभ्या असलेल्या बस व कार वाहून गेल्या आहेत.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत