राष्ट्रीय

एलआयसीच्या नफ्यात डिसेंबर तिमाहीत ४९ टक्के वाढ; भागधारकांना चार रुपये लाभांशाची भेट

एलआयसीचे डिसेंबर तिमाहीत निव्वळ प्रीमियम उत्पन्न ४.६७ टक्क्यांनी वाढून १.१७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

Swapnil S

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले असून ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत एलआयसीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर ४९ टक्क्यांनी वाढून ९,४४१ कोटी रुपये झाला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत नफा ६,३३४ कोटी रुपये नफा झाला होता. तिमाही निकाल जाहीर करताना एलआयसीने आपल्या शेअर्सधारकांना ४ रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला आहे.

एलआयसीचे डिसेंबर तिमाहीत निव्वळ प्रीमियम उत्पन्न ४.६७ टक्क्यांनी वाढून १.१७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. हे उत्पन्न मागील वर्षीच्या १.११ लाख कोटी रुपये होते. एलआयसीची सकल नॉन-परफॉर्मिंग ॲसेट्स (जीएनपीए) गेल्या वर्षी ५.०२ टक्क्यांच्या तुलनेत डिसेंबर तिमाहीत २.१५ टक्के आहे. तर सॉल्व्हेंसी रेशो १.९३ टक्के आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत हा रेशो १.८५ टक्के होता.

एयूएममध्ये ११.९८ टक्क्यांनी वाढ एलआयसीचे ॲसेट अंडर मॅनेजमेंट (एयूएम) डिसेंबर२०२३ पर्यंत वार्षिक ११.९८ टक्क्यांनी वाढून ४९.६६ लाख कोटी रुपये झाले आहे. ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत ते ४४.३४ लाख कोटी रुपये होते. एकूण वार्षिक प्रीमियम गेल्या वर्षीच्या १२,३७० कोटींवरून १३,१६३ कोटी रुपये वाढले. कंपनीच्या नवीन व्यवसायाचे मूल्य १८०१ कोटी रुपयांच्या तुलनेत २६३४ कोटी रुपये झाले. एलआयसीच्या कामगिरीबाबत अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती म्हणाले की, व्यवसायवाढीची ही फक्त सुरुवात आहे. आगामी काळात आमच्याकडे अनेक उत्पादने असून ती बाजारात आणली जाणार आहेत. काही उत्पादनांमध्ये सुधारणा करण्यास भरपूर वाव आहे

एमआरएफला तिमाहीत ५०९.७१ कोटींचा निव्वळ नफा

चेन्नई चेन्नई-मुख्यालय असलेल्या टायरची प्रमुख कंपनी एमआरएफ लिमिटेडने ऑक्टोबर-डिसेंबर २०२३ तिमाहीत करोत्तर एकत्रित नफा ५०९.७१ कोटी रुपये मिळवला आहे, असे कंपनीने शुक्रवारी सांगितले. गेल्या वर्षीच्या याच कालावधीत कंपनीने करोत्तर एकत्रित नफा १७४.८३ कोटी मिळवला होता. चालू आर्थिक वर्षात नऊ महिन्यांच्या कालावधीत एकत्रित नफा १,६८५.१२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो एका वर्षापूर्वीच्या ४२८.२९ कोटी रुपयांच्या तुलनेत उत्तम वाढला आहे. वरील तिमाहीत एकत्रित एकूण उत्पन्न ६,२४०.०८ कोटी रुपयांवर गेले आहे, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत ५,७१५.९१ कोटी झाले होते, असे एमआरएफ लिमिटेडने बीएसई फाइलिंगमध्ये म्हटले आहे. ३१ डिसेंबर २०२३ रोजी संपलेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत एकत्रित एकूण उत्पन्न १९,०४२.८८ कोटी रुपये होते, जे गेल्या आर्थिक वर्षात १७,३४९.६६ कोटी रुपये झाले होते. संचालक मंडळाची शुक्रवारी बैठक झाली आणि ३१ मार्च २०२४ रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी ३ रुपये प्रति इक्विटी शेअर (३० टक्के) दुसरा अंतरिम लाभांश घोषित केला.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी