राष्ट्रीय

एलआयसीच्या शेअर्सचा किंमतपट्टा ९०२ ते ९४९ रुपये जाहीर झाला

वृत्तसंस्था

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीच्या शेअर्सचा किंमतपट्टा ९०२ ते ९४९ रुपये जाहीर झाला आहे. हा आयपीओ ४ मे रोजी खुला, तर ९ मे रोजी बंद होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सूत्रांनी सांगितले की, एलआयसीच्या पॉलिसीधारकांना शेअरमागे ६० रुपये, तर किरकोळ गुंतवणूकदार व कर्मचाऱ्यांना ४० रुपये सवलत मिळणार आहे.
सरकारने फेब्रुवारीत एलआयसीचे पाच टक्के समभाग विक्रीस काढण्याचे नियोजन केले होते. ३१.६ कोटी समभाग विकले जाणार होते. याबाबत सेबीकडे ड्राफ्ट पेपर सादर केला आहे.
रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर बाजारात मोठ्या प्रमाणात अस्थिरता आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात सरकारने एलआयसीचे ३.५ टक्के समभाग विकण्याचे ठरवले आहे.


मुंबईकरांनी भाजपला दिला विक्रमी जनादेश; पंतप्रधान मोदींचे पालिका निकालासंदर्भात आसाममधील जाहीर सभेत प्रतिपादन

ठाकरे बंधूंचे पुनर्मिलन ठरले तोट्याचे!

समाज-संस्कृती-साहित्य

आजचे राशिभविष्य, १९ जानेवारी २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

मेन्टेनन्स योग्यच! प्रलंबित देखभाल शुल्क वसूल करण्याच्या सोसायटी निर्णयाला मान्यता