लेफ्टनंट जनरल सुब्रमणी देशाचे नवे ‘सीडीएस’; व्हाइस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन नौदल प्रमुखपदी (Photo-X)
राष्ट्रीय

लेफ्टनंट जनरल सुब्रमणी देशाचे नवे ‘सीडीएस’; व्हाइस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन नौदल प्रमुखपदी

केंद्र सरकारने शनिवारी भारतीय संरक्षण दलांमधील दोन अत्यंत महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली: केंद्र सरकारने शनिवारी भारतीय संरक्षण दलांमधील दोन अत्यंत महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. पाकिस्तान आणि चीन प्रकरणांतील तज्ज्ञ मानले जाणारे लेफ्टनंट जनरल एन.एस. राजा सुब्रमणी (निवृत्त) यांची देशाचे पुढील चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर, व्हाइस अॅडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची पुढील नौदलप्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे.

विद्यमान सीडीएस जनरल अनिल चौहान निवृत्त होत असून, त्यांच्या जागी सुब्रमणी ३० मे रोजी पदभार स्वीकारतील. लष्करी 'थिएटररायझेशन' (एकात्मिक युद्ध कमांड) योजनेची अंमलबजावणी करणे आणि तिन्ही दलांमध्ये ताळमेळ वाढवणे ही त्यांची प्राथमिक जबाबदारी असेल. व्हाइस अॅडमिरल स्वामीनाथन ३१ मे रोजी अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांच्याकडून नौदल प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारतील.

लेफ्टनंट जनरल सुब्रमणी यांचा ४० वर्षांहून अधिक काळ लष्करी सेवेचा प्रदीर्घ अनुभव आहे. ते १ जुलै २०२४ते ३१ जुलै २०२५ पर्यंत लष्कराचे उपप्रमुख होते. सध्या ते राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात (एनएससीएस) लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. त्यांना पाकिस्तान आणि चीन सीमांवरील ऑपरेशनल डायनॅमिक्सचे सखोल ज्ञान आहे. व्हाइस अॅडमिरल स्वामीनाथन सध्या पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख आहेत. १ जुलै १९८७ रोजी त्यांची नौदलात नियुक्ती झाली होती. ते 'कम्युनिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर' मधील तज्ज्ञ मानले जातात.

पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी; १० हजार पोलिसांचा बंदोबस्त, दोन हजार सीसीटीव्हींची नजर

सरकारी शाळा बंदच्या धोरणाविरोधात धरणे; आझाद मैदानावर ५ ऑक्टोबरपासून आंदोलन; सिंधुदुर्गातून ३००० जण सहभागी होणार

‘रेंट अ गरबा पार्टनर’ ॲपवर बंदी घाला; आमदार मेहतांची मागणी

वसंत डावखरे सीडी प्रकरणात मोठा निर्णय; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंसह चौघांची मुक्तता

Bhayandar : आहारबंदीप्रकरणी तपोवन शाळेला अल्पसंख्याक आयोगाची नोटीस; शिक्षण विभागाचीही कारणे दाखवा नोटीस