कैलाश विजयवर्गीय यांनी अक्षय कांती बम यांच्यासोबतचा फोटो शेअर केला, जे इंदूरमधून काँग्रेसचे उमेदवार होते. 
राष्ट्रीय

इंदूरमध्येही भाजपचा ‘सुरत पॅटर्न’; काँग्रेसच्या उमेदवाराने अर्ज घेतला मागे

Swapnil S

इंदूर : सुरतमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. त्यानंतर भाजपचा उमेदवार बिनविरोध विजयी झाला होता. आता इंदूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांती बम यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे भाजपचे उमेदवार शंकर लालवानी यांचा मार्ग सुकर झाला आहे.

भाजप आता सुरतप्रमाणे इंदूरमध्ये सहज विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे काँग्रेसनंतर अन्य उमेदवारांचे अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. हे खरे ठरल्यास सुरतनंतर इंदूर हे दुसरे शहर असेल, जेथे भाजपला निर्विवाद विजय मिळू शकतो. इंदूरमध्ये २३ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

अक्षय कांति बम यांच्यावर तीन वेगवेगळे खटले सुरू आहेत. निवडणुकीच्या काळात त्यांच्यावर १७ वर्षे जुना खटला पुन्हा चर्चेत आला. त्यात त्यांच्याविरोधात ३०७ (हत्येचा प्रयत्न) हा गुन्हा जोडला गेला.

अक्षय कांति बम यांच्यातर्फे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांची संपत्ती ८ कोटी आहे. तर अचल संपत्ती ४७ कोटी आहे. तर एकूण त्यांच्याकडे ७८ कोटींची संपत्ती आहे.

दरम्यान, या घडामोडीमुळे सुरतपाठोपाठ मध्य प्रदेशात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त