महादेव बेटिंग अ‍ॅपप्रकरणी सीबीआयचे सहा राज्यांत छापे 
राष्ट्रीय

महादेव बेटिंग अ‍ॅपप्रकरणी सीबीआयचे सहा राज्यांत छापे

महादेव ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणाचा तपास करत असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सहा राज्यांमधील ३३ ठिकाणी छापे टाकले आहेत. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणावर डिजिटल उपकरणे, मोबाईल फोन आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.

Swapnil S

नवी दिल्ली : महादेव ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणाचा तपास करत असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सहा राज्यांमधील ३३ ठिकाणी छापे टाकले आहेत. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणावर डिजिटल उपकरणे, मोबाईल फोन आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांवरून म्युल बँक खाती (दुसऱ्याच्या नावावर उघडलेली खाती) आणि हवाला चॅनेलचा गैरवापर होत असल्याचे उघडकीस आले आहे.

या प्रकरणातील मुख्य प्रमोटर सौरभ चंद्राकार याला ओमानमधून प्रत्यर्पान करून भारतात आणण्यात आले होते. त्याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे गेल्या काही दिवसांत दिल्ली, मुंबई, नागपूर, अमृतसर, भोपाळ आणि रायपूरसह विविध ठिकाणांच्या परिसरांवर ही शोधमोहीम राबवण्यात आली, असे एजन्सीने स्पष्ट केले. चंद्राकारच्या चौकशीतून प्लॅटफॉर्मच्या कामकाजाची माहिती आणि भारतातील पॅनेल ऑपरेटर्सच्या नेटवर्कचा उलघडा झाला आहे, असे सीबीआय प्रवक्त्यांनी नमूद केले.

तपासादरम्यान गोळा केलेल्या कागदपत्रांच्या व डिजिटल पुराव्यांच्या आधारे त्याची चौकशी करण्यात आली. आतापर्यंतच्या तपासात असे उघड झाले आहे की, हा प्लॅटफॉर्म परदेशातून एका मुख्यालयाद्वारे चालवला जातो आणि भारतात पॅनेल ऑपरेटर्सच्या मोठ्या नेटवर्कद्वारे त्याचे कामकाज चालते. हे ऑपरेटर्स ग्राहकांच्या आयडी हाताळतात, केवळ इतरांच्या नावावर उघडलेल्या किंवा भाड्याने घेतलेल्या बँक खात्यांमध्ये बेटिंगचे पैसे गोळा करतात आणि हवाला चॅनेलद्वारे नफा परदेशात पाठवतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai CNG Price Hike: आता सीएनजीही महाग; किलोमागे १.५० वाढ, नवा दर ९१.५० रुपये

नवा शैक्षणिक वादंग; खासगी विद्यापीठे, स्वायत्त महाविद्यालये शुल्क नियामक प्राधिकरणाच्या कक्षेत? विरोधकांचा आक्षेप, सत्ताधारीही अस्वस्थ

१४ कोटी मतदार अवैध, मग निवडणुका कशा वैध? राहुल गांधी यांचा सवाल

IND vs NZ 5th ODI: भारताच्या फलंदाजांचा कस; न्यूझीलंडविरुद्ध आज निर्णायक पाचवा एकदिवसीय सामना

'रामलीला'वरून माजणार रण; दिल्ली पोलिसांचा निर्बंधांचा प्रस्ताव, ५० हजार लोकांची मर्यादा