एक्स @narendramodi
राष्ट्रीय

महाकुंभमध्ये नरेंद्र मोदी यांनी त्रिवेणी संगमात केले पवित्र स्नान

उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात हजेरी लावून बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले.

Swapnil S

प्रयागराज : उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात हजेरी लावून बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार प्रयागराज येथे आलेल्या मोदी यांची स्नानावेळची वेशभूषाही वैशिष्ट्यपूर्ण आणि लक्षवेधी होती.

बुधवारी सकाळी दिल्लीहून विमानाने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रयागराज येथे पोहोचले. नियमितपणे कुर्ता पायजमा आणि जाकीट परिधान करणारे नरेंद्र मोदी हे महाकुंभमेळ्यामध्ये थोड्या वेगळ्याच रूपात दिसले. यावेळी नरेंद्र मोदींसोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही उपस्थित होते. नरेंद्र मोदी हे निषादराज क्रूजमधून संगमाजवळ पोहोचले. तिथे गळ्यात केसरी उपरणे आणि हातात रुद्राक्षांच्या माळा परिधान करून त्यांनी त्रिवेणी संगमात स्नान केले. यावेळी महाकुंभानिमित्त संगमतटावर आलेल्या लाखो भाविकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक पाहण्यासाठी उत्सुकता दिसून येत होती.

कडेकोट बंदोबस्त

यावेळी सीआरपीएफ आणि लष्कराच्या जवानांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर १३ जानेवारीपासून सुरू झालेल्या महाकुंभमेळ्यामध्ये आतापर्यंत ३९ कोटीहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केले आहे. नरेंद्र मोदी यांच्या आधी गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले आहे.

Maratha Reservation : मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी अखेर आझाद मैदानात; बेमुदत आंदोलनावर ठाम, पावसातही आंदोलकांचा उत्साह कायम

लातूर-नांदेडमध्ये मुसळधार पावसाचा कहर; बचावासाठी लष्कराची मदत, जनजीवन विस्कळीत

...तर मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीला धोका! मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप; २९,९६५ गणेशमूर्तीच विसर्जन

...तर भारताचा 'टॅरिफ' कमी करू! व्हाइट हाऊसचे सल्लागार पीटर नवारो यांचे वक्तव्य