राष्ट्रीय

महिंद्राचा तिसऱ्या तिमाहीत निव्वळ नफा ३४ टक्के वधारला

महिंद्रा अँड महिंद्राने बुधवारी ३१ डिसेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत करोत्तर एकत्रित नफ्यात ३४ टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे.

Swapnil S

मुंबई : महिंद्रा अँड महिंद्राने बुधवारी ३१ डिसेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत करोत्तर एकत्रित नफ्यात ३४ टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे. ऑटो प्रमुख कंपनीने गेल्या आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत रु. १,९८४ कोटींचा करोत्तर नफा मिळवला होता. महिंद्र अँड महिंद्रा (M&M) ने नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, वरील तिमाहीत महसूल १५ टक्क्यांनी वाढून ३५,२९९ कोटी रुपये झाला आहे, जो मागील वर्षीच्या कालावधीत ३०,६२१ कोटी रुपये होता. आमच्या व्यवसायांनी या तिमाहीत चांगली कार्यप्रदर्शन केले आहे, असे महिंद्रा अँड महिंद्राचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ अनिश शाह म्हणाले.

श्रीराम लाइफ इन्शुरन्सचा करोत्तर नफा ४३ टक्के वाढला

मजबूत विक्री आणि नवीन भागीदारीमुळे प्रेरित, श्रीराम लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने जाहीर केले की, त्यांनी ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३ या तिमाहीत ५० कोटी रुपयांचा करोत्तर नफा कमावला. गेल्या वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीच्या ३१ कोटींच्या तुलनेत त्यात ४३ टक्के वाढ झाली. कंपनीचा प्रीमियम मागील वर्षीच्या तिमाहीतील ३२४ कोटी रुपयांवरून दुप्पट वाढून ६९३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. श्रीराम लाइफने Q3FY23 साठी 31 कोटी रुपयांचा PAT नोंदवला आहे, असे श्रीराम लाइफ इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ कॅस्परस जे क्रोमहौट म्हणाले.

BMC Election 2026 : शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार ठरले; कोणत्या प्रभागात कोणाला संधी?

आधी लाथा-बुक्क्या, आता जादू की झप्पी; व्हायरल झालेल्या 'त्या' डॉक्टर आणि पेशंटचं भांडण मिटलं, नेमकं प्रकरण काय?

'मला सतत मेसेज करायचा'...; सूर्यकुमार यादवबाबत खळबळजनक दावा करणारी खुशी मुखर्जी कोण?

चीनचा तीळपापड! 'इतिहास बदलू शकत नाही'; सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान'चा ट्रेलर बघून तीव्र प्रतिक्रिया

“पूर्वी शिवसेना भाजपला जागा वाटायची, पण आज..." ; संजय राऊतांचा शिंदे गटावर घणाघात