राष्ट्रीय

Mahua Moitra: तृणमूलच्या महुआ मोइत्रा सर्वोच्च न्यायालयात; खासदारकी रद्द केल्याप्रकरणी याचिका दाखल

लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी व्यवसायिकांकडून पैसे घेतले असल्याचा आरोप करत महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती.

नवशक्ती Web Desk

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी आपली खासदारकी रद्द केल्याप्रकरणी सुप्रीय कोर्टात धाव घेतली आहे. महुआ यांनी लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी व्यवसायिकांकडून पैसे घेतले असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी नैतिकता समितीने महुआ मोइत्रा यांना दोषी ठरवत त्यांचं वर्तन अशोभनीय आणि अनैतिक असल्याचा ठपका ठेवला होता. शुक्रवार रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मोइत्रा यांची खासदारकी रद्द केली होती. दरम्यान, महुआ मोईत्रा यांनी याप्रकरणी आज(११ डिसेंबर) रोजी त्यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत याचिका दाखल केली आहे.

महुआ मोइत्रा यांच्यावर असलेले आरोप

तृणमुल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी लोकसभेच्या सदस्य पोर्टलचा युजर आयडी आणि पासवर्ड अनधिकृत व्यक्तीसोबत शेअर करुन सभागृहाचा अवमान केला. एवढच नाही तर, राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणली असल्याचा ठपता देखील संबंधित अहवालात ठेवण्यात आला. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी या प्रकरणी तक्रार केल्यानंतर नैनिकता समितीने चौकशी सुरु केली होती.

खासदारकी रद्द झाल्यानंतर महुआ या चांगल्याच संतप्त झाल्याचं पाहायला मिळाल्या. 'कांगारु कोर्टा'द्वारे आपल्याला हाकलून देण्याचा निर्णय फाशीच्या शिक्षेसारखा आहे. सरकारकडून विरोधकांना झुकवण्यासाठी संसदीय समितीचा वापर हा शस्त्र म्हणून केला जात आहे, अस्तितवात नसलेल्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल आपण दोषी आढळलो आहोत आणि रोख किंवा भेटवस्तू दिल्याचा कोणताही पुरावा नाही, असं महुआम मोइत्रा म्हणाल्या होत्या.

घरात चिखल, शेतात पाणीच पाणी! दुष्काळासाठी ओळखणारा मराठवाडा अतिवृष्टीने हैराण; बळीराजाच्या डोळ्यात अश्रू

मराठवाड्यात अतिवृष्टीचा कहर; ६७ गावांचा संपर्क तुटला, ८ जणांचा मृत्यू

महाराष्ट्र मंत्रिमंडळ निर्णय : आरोग्य उपचारांसाठी मोठा दिलासा, तर रेल्वे आणि गृहनिर्माण क्षेत्राला चालना

धाराशिव : नातू अन् आजी अडकले पुरात; खासदार ओमराजे निंबाळकर उतरले थेट पाण्यात, व्हिडिओ व्हायरल

Yavatmal : धक्कादायक! शिक्षकच बनला भक्षक; विद्यार्थिनीवर ९ महीने बलात्कार, गर्भपाताच्या गोळ्यांनी घेतला जीव