कटकच्या SCB रुग्णालयात भीषण आग; १० जणांचा मृत्यू IANS
राष्ट्रीय

कटकच्या SCB रुग्णालयात भीषण आग; १० जणांचा मृत्यू

ओडिशातील कटक येथील एससीबी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या ट्रॉमा केअर विभागात सोमवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत १० जणांचा मृत्यू झाला असून, मृतांपैकी बहुतांश जण ट्रॉमा केअर आयसीयूमध्ये दाखल असलेले रुग्ण होते.

Swapnil S

कटक : ओडिशातील कटक येथील एससीबी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या ट्रॉमा केअर विभागात सोमवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत १० जणांचा मृत्यू झाला असून, मृतांपैकी बहुतांश जण ट्रॉमा केअर आयसीयूमध्ये दाखल असलेले रुग्ण होते. ही घटना पहाटे सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास घडल्याचा अंदाज आहे.

ट्रॉमा केअर आपत्कालीन विभागाच्या पहिल्या मजल्यावर अचानक आग लागली. आग लागल्यानंतर रुग्णालयाची अग्निसुरक्षा यंत्रणा तत्काळ कार्यान्वित झाली आणि रुग्णालयाच्या अग्निशमन विभागाने त्वरित बचावकार्य सुरू केले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घटनास्थळी तीन अग्निशमन दलाच्या गाड्या पाठवण्यात आल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या प्रयत्नांनंतर आगीचा फैलाव रोखला. या घटनेमुळे रुग्णालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि रुग्णांचे नातेवाईक घाबरून इकडे-तिकडे धावू लागले. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन आयसीयूमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. गंभीर अवस्थेतील रुग्णांना रुग्णालयातील 'न्यू मेडिसिन आयसीयू'मध्ये हलवण्यात आले.

२५ लाख रुपयांची मदत

घटनेची माहिती मिळताच ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन माझी यांनी तातडीने रुग्णालयात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी 'न्यू मेडिसिन बिल्डिंग'मध्ये जाऊन बाधित रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी सुरू केली जाईल आणि त्यातून समोर आलेल्या निष्कर्षांच्या आधारे आवश्यक ती कारवाई केली जाईल. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपयांची सानुग्रह मदत देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.

ठाणे, डोंबिवली प्लॅटफॉर्मच्या विस्ताराकरिता आज ब्लॉक; काही गाड्या रद्द करण्यात येणार

Mumbai : हॉटेल ट्रायडेंटला BMC चा दणका; अनधिकृत बांधकाम हटवण्याचे दिले आदेश

विद्यार्थ्याला प्रथमच मिळणार CET ची दोन प्रवेशपत्रे; अस्थायी प्रवेशपत्रामध्ये परीक्षेचे ठिकाण; परीक्षा केंद्राची माहिती अंतिम प्रवेशपत्रात

पत्नी ही मोलकरीण नाही, तर अर्धांगिनी; घरकामात पतीचाही समान सहभाग हवा! सुप्रीम कोर्टाने टोचले 'नवरोबां'चे कान

जुगार-सट्टेबाजीची ३०० संकेतस्थळे एकाच वेळी ब्लॉक