राष्ट्रीय

भारतीय तटरक्षक दलाविरुद्ध मालदीवची तक्रार, देशाच्या विशेष आर्थिक क्षेत्रात अवैधपणे कारवाई केल्याचा दावा

Swapnil S

माले : भारतीय तटरक्षक दलाने मालदीवच्या विशेष आर्थिक क्षेत्रात (ईईझेड) अवैधपणे कारवाई केल्याची तक्रार करत मालदीवच्या सरकारने भारताकडे या घटनेची संपूर्ण माहिती देण्याची विनंती केली आहे.

भारतीय तटरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांनी १ फेब्रुवारी रोजी मालदीवजवळच्या समुद्रात विशेष आर्थिक क्षेत्रात प्रवेश करून त्यांच्या ३ मासेमारी नौकांवर उतरून मच्छिमारांची चौकशी केली. नंतर या कर्मचाऱ्यानी मालदीवच्या आणखी दोन मासेमारी नौकांवरील मासेमारांची चौकशी केली.

भारताचे हे कर्मचारी कोस्ट गार्ड शिप क्रमांक २४६ आणि २५३ वरून आले होते. त्यांनी मालदीवच्या विशेष आर्थिक क्षेत्राताच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. तेव्हा भारताने या घटनेसंसंधी सविस्तर माहिती सादर करावी, अशी मागणी मालदीवच्या सरकारने केली आहे. भारत सरकारने त्यावर लागलीच काही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

गेल्या काही दिवसांत मालदीव आणि भारताचे संबंध ताणले गेले आहेत. मालदीवमध्ये गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात निवडून आलेले अध्यक्ष मोहम्मद मुईझू हे चीनधार्जिणे आहेत. त्यांनी निवडून आल्यावर भारताला मालदीवमधील सैन्य मागे घेण्यास सांगितले. भारताबरोबरील जलविज्ञान करार रद्द केला.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यावरून पुन्हा वाद निर्माण झाला. समाजमाध्यमांवरून मोदी यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट केल्याने मालदीवच्या तीन मंत्र्यांना पदावरून हटवण्यात आले. त्यावेळी अनेक भारतीयांनी मालदीवच्या प्रवासावर बहिष्कार टाकला. त्यानंतर मालदीवच्या विरोधी पक्षांनी अध्यक्ष मुईझू यांच्याविरुद्ध संसदेच अविश्वासाचा ठराव आणला तेव्हा दोन्ही पक्षांच्या खासदारांत हाणामारी झाली. त्यानंतर मालदीवच्या विरोधी पक्षांनी मुईझू यांना हटवण्यासाठी महाभियोग चालवण्याची तयारी केली आहे. तेव्हाच तटरक्षक दलाचे नवे प्रकरण उद्भवले आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त