(संग्रहित छायाचित्र)
राष्ट्रीय

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह यांच्या विरोधातील वाॅरंटला स्थगिती, २७ मार्चला हजर राहण्याचे निर्देश

जामीनपात्र वॉरंटला स्थगिती देत साध्वी प्रज्ञासिंग यांना तात्पुरता दिलासा दिला. याचवेळी २७ मार्चला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले

Swapnil S

मुंबई : २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याविरुद्ध बजावलेल्या जामीनपात्र वॉरंटला बुधवारी विशेष एनआयए न्यायालयाने स्थगिती दिली. कारवाईचा इशारा दिल्यानंतरही सुनावणीला हजर न राहिल्यामुळे न्यायालयाने १० हजार रुपयांचे जामीनपात्र वॉरंट बजावले होते. तथापि, साध्वी प्रज्ञासिंह यांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे, अशी माहिती त्यांच्या वकिलांनी बुधवारी दिली. त्यामुळे न्यायालयाने वाॅरंटला स्थगिती दिली.

विशेष न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी गेल्या आठवड्यात प्रज्ञासिंह यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट बजावले होते आणि सुनावणीला व्यक्तिशः हजर राहण्याचे सक्त आदेश दिले होते. मात्र हे वाॅरंट अद्याप साध्वी प्रज्ञासिंह यांच्यापर्यत पोहोचलेले नाही. तसेच त्या सध्या रुग्णालयात दाखल असल्याचे वकिलांनी सांगितले. दोन्ही गोष्टींची दखल घेत विशेष न्यायाधीश लाहोटी यांनी जामीनपात्र वॉरंटला स्थगिती देत साध्वी प्रज्ञासिंग यांना तात्पुरता दिलासा दिला. याचवेळी २७ मार्चला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.

२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावच्या मशिदीजवळ बॉम्बस्फोट होऊन ६ ठार, तर १०० हून अधिक नागरिक जखमी झाले होते.

Mumbai : विहिरींना निधी देण्यास टाळाटाळ; प्रत्येकी ३० लाख देण्याचा निर्णय कागदावरच, लेखा विभागाकडून प्रस्ताव पुन्हा जल विभागाकडे

Mumbai : महापालिकेच्या विधी खात्यातील ३५ पदांना कात्री! अनावश्यक पदे कायमची रद्द; २५ नवीन पदांची भर

आसाममध्ये रेल्वेचा मोठा अपघात! कोलकाता-सैरांग एक्स्प्रेसचे ६ डबे रुळावरून घसरले; बचावकार्य सुरू, Video

"मिस यू दादा! तुझ्याशिवायची ही पहिली भाऊबीज..."; अजित पवारांच्या आठवणीने सुप्रिया सुळे गहिवरल्या

पुन्हा ५००, २००० रु.च्या नोटा बंद करा; आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची मागणी