राष्ट्रीय

ममता बॅनर्जी यांच्या वाहनावर चिखल, चपलांचा मारा

पोलीस कोठडीत मरण पावलेल्या तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेलेल्या ममता बॅनर्जी यांना रविवारी संतप्त निदर्शनांना सामोरे जावे लागले. आंदोलकांनी त्यांच्या वाहनाला घेराव घालत ‘चोर’ आणि ‘डकैत राणी’ अशा घोषणा दिल्या. तसेच त्यांच्या वाहनावर चिखल, चपला आणि दगड फेकले.

Swapnil S

कोलकाता : पोलीस कोठडीत मरण पावलेल्या तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेलेल्या ममता बॅनर्जी यांना रविवारी संतप्त निदर्शनांना सामोरे जावे लागले. आंदोलकांनी त्यांच्या वाहनाला घेराव घालत ‘चोर’ आणि ‘डकैत राणी’ अशा घोषणा दिल्या. तसेच त्यांच्या वाहनावर चिखल, चपला आणि दगड फेकले.

उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील हालीशहर येथे गेलेल्या बॅनर्जी यांना पोलिसांच्या सुरक्षा कड्यातून घटनास्थळी जावे लागले. या वेळी रस्त्यावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. सत्ताधारी आणि विरोधी गटांकडून परस्परांवर आरोप करण्यात आले.

या घटनेनंतर पत्रकारांशी बोलताना बॅनर्जी म्हणाल्या, “माझ्या गाडीवर दगड, चपला आणि चिखल फेकण्यात आला. हा केवळ कटाचा भाग आहे. मी येणार असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. तरीही सुरक्षेची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही.”

ममता बॅनर्जी ज्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या, त्या मृत टीएमसी कार्यकर्त्याचे नाव बिरजू केओट असे आहे. ते कांचरापाडा नगरपालिकेच्या माजी नगरसेविका जेनी शर्मा केओट यांचे पती होते.खंडणीसह काही आरोपांप्रकरणी हालीशहर पोलिसांनी केओट यांना अटक केली होती.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : उद्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री जम्बो ब्लॉक, कोणत्या लोकल रद्द? जाणून घ्या

Mumbai CJP Protest : अभिनेता इम्रान खान पोलिसांच्या ताब्यात; व्हॅनमधून फोटो शेअर करत म्हणाला...

CJP Protest : आंदोलनाला हिंसक वळण; अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जींसह अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात, Video

CJP Protest : अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; जंतर-मंतरवरील आंदोलनाची धुरा आता अजिंक्य शिंदेंकडे, Video

अभिजीत दिपके यांच्या आजीचं निधन; नातू दिल्लीत पोलिसांच्या ताब्यात, अंत्यसंस्कारासाठी गावी परतण्याची शक्यता