Mathura Boat Tragedy : यमुना नदीत नाव उलटून १० जणांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता 
राष्ट्रीय

Mathura Boat Tragedy : यमुना नदीत नाव उलटून १० जणांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

मथुरा जिल्ह्यातील वृंदावन येथे शुक्रवारी दुपारी पर्यटकांनी भरलेली एक नाव यमुना नदीत उलटल्याची धक्कादायक घटना घडली.

Swapnil S

मथुरा : मथुरा जिल्ह्यातील वृंदावन येथे शुक्रवारी दुपारी पर्यटकांनी भरलेली एक नाव यमुना नदीत उलटल्याची धक्कादायक घटना घडली. या भीषण अपघातात किमान १० जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत. नौकेतील सर्व पर्यटक हे पंजाबमधील आहेत.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे नदीच्या मध्यभागी नाव हेलकावे घेऊ लागली. वाऱ्याच्या वेगामुळे नावेचा वेग अनियंत्रित झाला आणि ती एका पँटून पुलाला जाऊन धडकली. या धडकेमुळे नाव उलटून अपघात घडला.

बचावकार्याची सद्यस्थिती

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सहा जणांचे मृतदेह हाती आले असून १६-१७ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि सुमारे ५० स्थानिक पाणबुडे घटनास्थळी कार्यरत आहेत. स्थानिक पाणबुडे 'गुलाब' याने दिलेल्या माहितीनुसार, त्याने स्वतः आतापर्यंत १५ जणांना पाण्याबाहेर काढण्यास मदत केली आहे.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. नदीच्या खोल भागात बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे. पोलीस आणि स्थानिक प्रशासन संयुक्तपणे हे मदतकार्य राबवत आहेत.

Nana Patekar Passes Away: 'नटसम्राट' नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, गोव्यात घेतला अखेरचा श्वास

Mumbai : मुलुंडमध्ये बांधकामाधीन इमारतीच्या आवारात भीषण आग; ७ गॅस सिलिंडरचे स्फोट, परिसरात धुराचे लोट, Video व्हायरल

Nana Patekar : 'मी आज आहे, उद्या नसेन'; नाना पाटेकरांचा अखेरच्या भाषणाचा VIDEO व्हायरल

SIR Protest : ध्रुव राठी CJP च्या आंदोलनासाठी भारतात; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी, 'लढा सुरूच राहणार', दिपकेंचा निर्धार

मध्यरात्री मित्राला मेसेज, श्वास घेण्यास त्रास अन्...; नाना पाटेकरांच्या शेवटच्या तासांत नेमकं काय घडलं? डॉक्टरांनी सांगितला घटनाक्रम