स्क्रीनग्रॅब, पीटीआय
राष्ट्रीय

काश्मीरप्रश्न द्विपक्षीय, ‘तिसऱ्या’ची लुडबूड नको! परराष्ट्र मंत्रालयाने ठणकावले

जम्मू-काश्मीर प्रश्न भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील आहे. त्यात कोणत्याही ‘तिसऱ्या’ची लुडबूड नको. हा प्रश्न भारत आणि पाकिस्तान आपापसात सोडवतील, असे भारताने मंगळवारी जगाला ठणकावले.

Swapnil S

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर प्रश्न भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील आहे. त्यात कोणत्याही ‘तिसऱ्या’ची लुडबूड नको. हा प्रश्न भारत आणि पाकिस्तान आपापसात सोडवतील, असे भारताने मंगळवारी जगाला ठणकावले. पाकिस्तानला पाकव्याप्त काश्मीर रिकामा करावा लागेल. सर्व प्रश्न द्विपक्षीय मार्गाने निकाली काढले जातील, असे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी सांगितले.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जम्मू-काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी मध्यस्थीस तयार असल्याचे जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर भारताने मंगळवारी आपली भूमिका जाहीर केली.

जैस्वाल म्हणाले की, जम्मू-काश्मीर मुद्यावर तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप मंजूर नाही. हा मुद्दा भारत-पाकिस्तान आपापसात चर्चेने सोडवतील. यात कोणताही बदल होणार नाही. तसेच केवळ पाकव्याप्त काश्मीरबाबत दोन्ही देशांमध्ये चर्चा होईल, असे त्यांनी सांगितले.

ट्रम्प यांच्या अणुयुद्धाच्या अटकळींवर बोलताना ते म्हणाले की, ही लष्करी कारवाई पूर्णपणे पारंपरिक पद्धतीने राबवण्यात आली. राष्ट्रीय कमांड प्राधिकरणाची १० मे रोजी बैठक होणार आहे, अशी बातम्या होत्या. मात्र, त्यांनी हे नाकारले.

पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनीही स्वतः अणुयुद्धावर बोलणे फेटाळले होते. आम्ही अण्वस्त्र ब्लॅकमेलला बळी पडणार नाही किंवा सीमापार दहशतवाद घडवू देणार नाही, अशी भारताची ठाम भूमिका आहे, असे जैस्वाल म्हणाले.

सिंधू जल करार स्थगित राहणार

जैस्वाल म्हणाले की, भारत-पाकिस्तान युद्धविरामानंतरही सिंधू जल करार स्थगित राहणार आहे. मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीच्या निर्णयानुसार, पाकिस्तान जोपर्यंत सीमेपलिकडून दहशतवादाला आपले समर्थन देणे बंद करत नाही, तोपर्यंत हा करार स्थगित राहील. अनेक दशकांपासून पाकिस्तान सीमेपलिकडून दहशतवादाला पाठिंबा देत आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक