राष्ट्रीय

मेरठमध्ये गणपती विसर्जनादरम्यान तरुणाची चाकूने वार करून हत्या; व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद

उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये गणपती विसर्जनादरम्यान एका तरुणावर चाकूने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्या तरुणाला गंभीर अवस्थेत खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या हत्येचा थरार व्हिडिओमध्ये कैद झाला असून. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Mayuri Gawade

उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये गणपती विसर्जनादरम्यान एका तरुणावर चाकूने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्या तरुणाला गंभीर अवस्थेत खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या हत्येचा थरार व्हिडिओमध्ये कैद झाला असून. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बॉबी गौतम असे या तरुणाचे नाव असून तो सरधना परिसरात राहायचा. बॉबी एका कपड्यांच्या दुकानात सेल्समन होता.

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी बॉबीचा एका सहकाऱ्याशी वाद झाला होता, पण नंतर दोघांनी आपसात तो मिटवला होता. रात्री सुमारे १० वाजताच्या सुमारास गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान काही तरुणांनी पुन्हा भांडण सुरू केले आणि बॉबीवर चाकूने हल्ला केला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.

इतर लोकांनी बॉबीला तातडीने खाजगी रुग्णालयात नेले. गंभीर स्थिती लक्षात घेऊन डॉक्टरांनी त्याला मेरठमध्ये पाठवले, पण कुटुंबीयांनी त्याला कंकरखेरा येथील खाजगी रुग्णालयात नेले, जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दोन गटांमधील लोकांची भांडणं आणि एका अज्ञात व्यक्तीने बॉबीवर चाकूने हल्ला करत असल्याचे स्पष्ट दिसते.

पोलीसांनी या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, मृतकाचे कुटुंबीय पोलीस ठाण्यात गेले आणि आरोपींविरुद्ध त्वरित कारवाईची मागणी केली.

ओबीसी आरक्षणाला धक्का नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; नोंदी असलेल्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार

‘देवाभाऊ’ कॅम्पेनवरून जोरदार वादंग; जाहिरात देणारा भाजपच्या मित्रपक्षाचा मंत्री - रोहित पवार

मुंबईला मिळणार वातानुकूलित वंदे मेट्रो; २ हजार ८५६ डब्यांच्या खरेदीची निविदा जाहीर

निवडणूक आयोग भाजपचे कार्यालय बनले का? मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

अस्तित्व वाचवण्यासाठी ओमी कलानींची धडपड; अखेर युतीसाठी शिंदे गटाचा दरवाजा ठोठावला