मेरठमध्ये एकाच कुटुंबातील ६ जणांचा होरपळून मृत्यू PTI
राष्ट्रीय

मेरठमध्ये एकाच कुटुंबातील ६ जणांचा होरपळून मृत्यू

सोमवारी संध्याकाळी या कुटुंबाचे प्रमुख असलेले कापड व्यापारी आसिम हे नमाज पढायला गेले होते, तेव्हा तीन मजली घरात भीषण आग लागली. त्यावेळी घरात महिला, मुलांसह १२ लोक होते. तळमजल्यावर लागलेली आग इतक्या वेगाने पसरली की कोणालाही बाहेर पडायला वेळ मिळाला नाही.

Swapnil S

मेरठ : मेरठमध्ये एका कापड व्यापाऱ्याच्या कुटुंबातील ६ लोकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. यात जुळ्या मुलींसह ५ मुले आहेत.

सोमवारी संध्याकाळी या कुटुंबाचे प्रमुख असलेले कापड व्यापारी आसिम हे नमाज पढायला गेले होते, तेव्हा तीन मजली घरात भीषण आग लागली. त्यावेळी घरात महिला, मुलांसह १२ लोक होते. तळमजल्यावर लागलेली आग इतक्या वेगाने पसरली की कोणालाही बाहेर पडायला वेळ मिळाला नाही. सर्वजण आगीच्या ज्वाळांमध्ये अडकले. शेजाऱ्यांनी तत्काळ पहिल्या मजल्यावर अडकलेल्या ५ लोकांना शिडी लावून बाहेर काढले. पण, दुसऱ्या मजल्यावर एक महिला आणि ५ मुले अडकले. आग आणि धूर पाहून महिला घाबरली, तिने वाचण्यासाठी सर्व मुलांसह स्वतःला खोलीत बंद करून घेतले. थोड्याच वेळात पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक पोहोचले.

आगीच्या दरम्यान दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचण्याचा कोणताही मार्ग मिळाला नाही, म्हणून शेजाऱ्याची भिंत तोडण्यात आली. पण, तोपर्यंत महिला आणि ५ मुलांचा मृत्यू झाला होता.

या दुर्घटनेत कापड व्यापारी आसिम यांची पत्नी रुखसार (३०), जुळ्या मुली अनाबिया, इनायत (६ महिने), अकदस (३ वर्षे) आणि भाऊ फारुक यांची दोन मुले महविश (१२) व हम्माद (४ वर्षे) यांचा मृत्यू झाला.

कपड्यांमुळे आग वेगाने पसरली

लिसाडीगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुराही वाली मशिदीजवळ, किदवई नगरच्या गल्ली क्रमांक-१ मध्ये ही घटना घडली. तीन मजली घरात इक्बाल अहमद यांचे कुटुंब राहत होते. इक्बाल कपडे तयार करतात. ऑर्डरनुसार आणि इतर शहरांमध्ये लागणाऱ्या प्रदर्शनांमध्ये ते त्यांची विक्री करतात. त्यांच्या कुटुंबात ५ मुलगे आहेत. यापैकी ३ जणांचे लग्न झाले होते, तर दोघे अविवाहित आहेत.

BMCचा मोठा निर्णय : अधिकृत फेरीवाल्यांना मिळणार QR कोड प्रमाणपत्र; बेकायदेशीर विक्रेत्यांना मोठा इशारा

BMC Budget 2026: ९० मिनिटांचा प्रवास आता फक्त २० मिनिटांत; मेगा रोड प्रोजेक्ट्समुळे मुंबईकरांना फायदा

Mumbai : राणीबागेत लवकरच गुजरातच्या सिंहाची गर्जना; सिंहाच्या मागणीसाठी मुंबईच्या महापौरांचे गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

Thane : अपघात आणि नियमभंगावर लगाम; स्कूल बसमध्ये आता डॅश कॅम अनिवार्य, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जिल्हास्तरीय समितीचा निर्णय

Mumbai : प्रवाशांना दिलासा! विधानभवन मेट्रो स्थानकाचे B-४ गेट सुरू; B-५ वर निर्बंध कायम, जाणून घ्या पर्यायी मार्ग