पुणे-अहिल्यानगर महामार्गावर भरधाव कारची दुभाजक ओलांडून ट्रकला धडक; ३ तरुणांचा मृत्यू, २ जखमी

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारने रस्त्याचा दुभाजक ओलांडला. यानंतर कार एका बाजूला कलंडली आणि पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर सुमारे ६० ते ७० मीटर घसरत गेली.
पुणे-अहिल्यानगर महामार्गावर भरधाव कारची दुभाजक ओलांडून ट्रकला धडक; ३ तरुणांचा मृत्यू, २ जखमी
पुणे-अहिल्यानगर महामार्गावर भरधाव कारची दुभाजक ओलांडून ट्रकला धडक; ३ तरुणांचा मृत्यू, २ जखमी'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

पुणे : पुणे-अहिल्यानगर महामार्गावर वाघोली परिसरात सोमवारी (दि. २३) मध्यरात्री भीषण अपघात झाला. भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याचा दुभाजक ओलांडून पलीकडील मार्गावर गेली आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. या अपघातात कारमधील तीन तरुणांचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले आहेत.

पुणे-अहिल्यानगर महामार्गावर भरधाव कारची दुभाजक ओलांडून ट्रकला धडक; ३ तरुणांचा मृत्यू, २ जखमी
Palghar Bus Accident : शिवशाही बसची कठड्याला धडक; २४ प्रवासी सुखरूप

वाघोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघोलीतील विठ्ठलवाडी कमानीजवळ सोमवारी मध्यरात्री १.२५ च्या सुमारास हा अपघात घडला. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारने रस्त्याचा दुभाजक ओलांडला. यानंतर कार एका बाजूला कलंडली आणि पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर सुमारे ६० ते ७० मीटर घसरत गेली. अखेर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला कारची जोरदार धडक बसली.

पोलिसांकडून बचावकार्य

अपघाताची माहिती मिळताच वाघोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अपघातग्रस्त कारमधून जखमी तरुणांना बाहेर काढले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जवळच्या आय-मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघातात जखमी झालेल्या आशुतोष नंदकुमार मर्कड (२८) आणि प्रणय भरत शिंदे (२४) या दोघांना तातडीने वाघोलीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, अपघातानंतर दोघेही शुद्धीत होते.

कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

या भीषण अपघातात ओंकार अजय सूर्यवंशी (२४), शंकर वासुदेव ढोले (२२) आणि मयूर सतीश औती (२३) या तिघांचा मृत्यू झाला. हे तिघेही वाघोलीतील फुलमळा रोड परिसरातील रहिवासी होते. तरुणांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघातामुळे परिसरातही घबराट पसरली.

पुणे-अहिल्यानगर महामार्गावर भरधाव कारची दुभाजक ओलांडून ट्रकला धडक; ३ तरुणांचा मृत्यू, २ जखमी
Rajasthan Accident : देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला; महाराष्ट्रातल्या एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू, ६ जखमी

दरम्यान, कार ट्रकवर नेमकी कोणत्या परिस्थितीत आदळली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अपघाताचा घटनाक्रम समजून घेण्यासाठी वाघोली पोलीस तपास करत असून, संबंधित माहिती गोळा केली जात आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)