Photo : X (@IAF_MCC)
राष्ट्रीय

‘मिग-२१’ लढाऊ विमान निवृत्त होणार; ‘उडती शवपेटी’ म्हणून ओळख, १९ सप्टेंबरला एक ‘अध्याय’ संपणार

भारतीय हवाई दलाची एकेकाळी शान असलेले ‘मिग-२१’ हे लढाऊ विमान येत्या १९ डिसेंबर २०२५ रोजी सेवेतून निवृत्त होणार आहे. जवळपास ६३ वर्षे अखंड सेवा या विमानाने बजावली.

Swapnil S

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाची एकेकाळी शान असलेले ‘मिग-२१’ हे लढाऊ विमान येत्या १९ डिसेंबर २०२५ रोजी सेवेतून निवृत्त होणार आहे. जवळपास ६३ वर्षे अखंड सेवा या विमानाने बजावली. या प्रदीर्घ काळात या विमानाला अनेक अपघात झाले. त्यामुळे ‘उडती शवपेटी’ म्हणून बदनाम झालेले हे विमान सेवेतून काढून टाकण्याची मागणी अनेक वर्षे केली जात होती.

चंदिगडच्या हवाई तळावर २३ स्क्वाड्रनच्या एका खास कार्यक्रमात या विमानाला ‘अलविदा’ म्हटले जाणार आहे. भारतीय हवाई दलात १९६३ मध्ये हे विमान सामील झाले होते. हे भारताचे पहिले ‘सुपरसॉनिक’ जेट विमान होते. ज्याने ६३ वर्षे भारताची हवाई ताकद म्हणून काम केले.

या विमानाला सातत्याने होणाऱ्या अपघातामुळे त्याला ‘उडती शवपेटी’ म्हणून संबोधले जात होते. आता हे विमान निवृत्त झाल्यानंतर हवाई दलाकडे २९ स्क्वाड्रन उरणार आहेत.

भारताचे पहिले सुपरसॉनिक जेट : ‘मिग-२१’ हे विमान रशियात बनवलेले लढाऊ विमान होते. त्याला १९६३ मध्ये भारतीय हवाई दलात सामील करण्यात आले. ते भारतचे पहिले सुपरसॉनिक जेट होते. ध्वनीच्या वेगाने उडण्याची त्याची क्षमता आहे. हे विमान भारताच्या हवाई दलाची मोठी ताकद होती. भारताकडे एकूण ८७४ ‘मिग-२१’ विमाने होती. त्यातील ६०० विमाने भारतात बनवली गेली. हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडने त्याचे उत्पादन केले.

अनेक युद्धात सहभाग

  • १९६५ - भारत-पाक युद्धात पहिल्यांदा ‘मिग-२१’ सहभागी झाले. त्याने पाक विमानांना कडवी टक्कर दिली.

  • १९७१ - पूर्व पाकिस्तानच्या स्वातंत्र्यात ‘मिग-२१’ने मोठी भूमिका बजावली. पाकिस्तानी ठिकाणांवर अचूक हल्ले केले.

  • १९९९ - रात्रभर उड्डाण करून शत्रूची कंबर मोडली. त्यावेळी वैमानिकांनी साधारण ‘जीपीएस’ व ‘स्टॉपवॉच’ने हल्ले केले.

  • २०१९ - बालाकोट हल्ल्यात ‘मिग-२१’ बायसन या विमानाने पाकचे ‘एफ-१६’ विमान पाडले.

  • २०२५ - ऑपरेशन सिंदूरमध्ये ‘मिग-२१’ने सहभाग घेतला.

न्या. वर्मा यांच्या याचिकेवरील सुनावणीतून सरन्यायाधीशांची माघार; विशेष खंडपीठ स्थापन करण्यात येणार

2006 Mumbai Local Train Blasts : हायकोर्टाच्या निकालाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, सुटलेल्या आरोपींचं काय होणार?

चाकरमान्यांना बाप्पा पावला! गणेशोत्सवासाठी ST ची ३०% भाडेवाढ अखेर रद्द

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया आयोगाकडून सुरू

सूरज चव्हाण अखेर शरण; जामिनावर सुटका