नवी दिल्ली : केंद्र सरकारने यूपीआय व्यवहारांवर लादलेल्या ०.४ टक्के ‘मर्चंट डिस्काउंट रेट’ (एमडीआर) शुल्काचा निषेध म्हणून भारतातील मोबाईल फोन विक्रेत्यांनी २ ऑक्टोबर हा दिवस ‘नो यूपीआय डे’ म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती ‘ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशन’ या उद्योग संघटनेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. शासनाने १५ ऑक्टोबरपासून व्यापाऱ्यांना होणाऱ्या २,००० रुपयांपेक्षा जास्त रक्कमेच्या यूपीआय हस्तांतरणावर ०.४ टक्के शुल्क लागू केले आहे, तर व्यक्तींमधील (पी २ पी) व्यवहार तसेच लहान मूल्याच्या देयकांना या शुल्कातून वगळण्यात आले आहे.
पात्र व्यापारी यूपीआय व्यवहारांवर लागू होणाऱ्या ०.४ टक्के एमडीआर मोबाईल विक्रेत्यांच्या चिंतांकडे लक्ष वेधण्यासाठी ‘ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशन’ने २ ऑक्टोबर २०२६ रोजी 'नो यूपीआय डे'चे आवाहन केले आहे," असे ‘आयम्रा’चे उपाध्यक्ष आणि दिल्ली-एनसीआर क्षेत्राचे अध्यक्ष तरविंदर सिंग यांनी म्हटले आहे.