राष्ट्रीय

‘अल्ट न्यूज’चे मोहम्मद झुबेरना नोबेलसाठी मिळाले नामांकन

‘फॅक्ट चेक’ संकेतस्थळ ‘अल्ट न्यूज’च्या संस्थापकांशिवाय २०२२ च्या नोबेल पुरस्कारांच्या शर्यतीत एकूण ३४३ जण आहेत.

वृत्तसंस्था

फॅक्ट चेक’ वेबसाईट ‘अल्ट न्यूज’चे सहसंस्थापक मोहम्मद झुबेर आणि प्रतिक सिन्हा यांना यंदाच्या शांततेच्या नोबेलसाठी नामांकन मिळाले आहे. शांततेच्या नोबेलची घोषणा येत्या ७ ऑक्टोबर रोजी ऑस्लो येथे केली जाणार असून त्यात या दोघांना नोबेल मिळणार का? याची उत्सुकता आता निर्माण झाली आहे.

‘फॅक्ट चेक’ संकेतस्थळ ‘अल्ट न्यूज’च्या संस्थापकांशिवाय २०२२ च्या नोबेल पुरस्कारांच्या शर्यतीत एकूण ३४३ जण आहेत. यापैकी २५१ जण हे वैयक्तिक तर ९२ संघटना पुरस्कारांच्या शर्यतीत आहेत. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी जूनमध्ये दिल्ली पोलिसांनी झुबेर यांना अटक केली होती. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने त्यांना अटक केल्यानंतर त्यांच्या अटकेचा जगभरातून निषेध करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर एक महिन्याने झुबेर तिहार तुरुंगातून बाहेर आले होते. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की, संयुक्त राष्ट्र शरणार्थी संस्था, डब्ल्यूएचओ आमि रशियन राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांचे टीकाकार अॅलेक्सी नवाल्नी यांचीही नावे नामांकनात आहेत. दरम्यान, नॉर्वेतील खासदारांनी नामांकन केलेल्या उमेदवारांमध्ये बेलारूसचे विरोधी पक्षनेते स्वेतलाना सिखानौस्काया, ब्रॉडकास्टर डेव्हीड अॅटनबोराफ, ग्रेटा थनबर्ग, पोप फ्रान्सिस, तुवालुचे परराष्ट्रमंत्री सायमन कोफे आणि म्यानमारचे राष्ट्रीय एकता सरकार यांचा समावेश आहे.

Bihar Election Results 2025 Live Updates: राघोपूरमध्ये 'कांटे की टक्कर' सुरूच; तेजस्वी यादव पुन्हा पिछाडीवर

Assembly Bypolls Result 2025 : अंतापाठोपाठ जुबली हिल्समध्येही काँग्रेसचा दमदार विजय; बघा अन्य ६ जागांवर कोणाची बाजी?

सुवर्णकाळ गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचे निधन; ९८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Red Fort Blast : दिल्ली बॉम्बस्फोटप्रकरणी मोठी कारवाई; मास्टरमाईंडचे घर सुरक्षा दलाने उडवले

पत्नीला साडेतीन लाखांची भरपाई देण्याचे आदेश; आर्थिक स्थितीची चुकीची माहिती देणाऱ्या पतीला न्यायालयाचा दणका