राष्ट्रीय

Madhya Pradesh CM : अखेर तिढा सुटला! मोहन यादव मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री

नवशक्ती Web Desk

गेल्या आठवड्यात देशातील पाच राज्यांच्या निकाल हाती आले. यात तीन राज्यात भाजपला प्रचंड मोठं यश मिळालं आहे. असं असलं तरी या राज्यांममध्ये भाजपने मुख्यमंत्री पदाचा कोणताही चेहरा समोर केला नव्हता. भाजपकडून मुख्यमंत्री पदाबाबत सस्पेन्स ठेवण्यात आला होता. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार असलेल मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचं देखील भाजपने मुख्यमंत्री पदासाठी जाहीर केलं होतं. तसंच या नेत्यांकडून देखील मुख्यमंत्री पदावर कोणताही अधिकृत दावा करण्यात आला नव्हता. आता मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवलेल्या भाजपने अखेर मुख्यमंत्रिपदाचा तिढा सोडवला आहे. शिवराजसिंह चौहान यांच्याऐवजी भाजपने नवा चेहरा आणला आहे. मोहन यादव आता मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री असणार आहे.

कोण आहेत मोहन यादव?

मोहन यादव हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे मानले जातात. शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळात मोहन यादव यांनी काम केलं आहे. भाजपच्या विधीमंडळ गटनेता ठरवण्यासाठी आज बैठक करण्यात आली होती. या बैठकीत शिवराजसिंह चौहान यांनीच मोहन यादव यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. त्या प्रस्तावाला भाजप आमदारांनी अनुमोदन दिल्याने, मोहन यादव हे मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री असतील यावर शिक्कामोर्तब झालं आहे .

3 डिसेंबर 2023 रोजी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला होता. त्यानंतर आठ दिवसानंतर मोहन यादव यांच्या नावावर शिक्काबोर्तब करण्यात आला आहे. मोहन यादव उज्जैन दक्षिणमधून तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. 2020 ते 2023 यादरम्यान मोहन यादव यांनी मध्य प्रदेश राज्याचे शिक्षण मंत्री म्हणून काम पहिले आहे. मोहन यादव यांची मुख्यमंत्रीपदी निवड करत भाजपने देशभरातील लोकांना एकप्रकारे धक्काच दिला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार असलेल्या शिवराज सिंह चौहान यांना मुख्यमंत्री पदी विराजमान न केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस