ANI
राष्ट्रीय

भारतात मंकीपॉक्सनं चिंता वाढवली; ‘या’ ठिकाणी आढळला दुसरा रुग्ण

संबंधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व नातेवाईकांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे.

प्रतिनिधी

भारतात मंकीपॉक्स संसर्गानं चिंता वाढवली आहे. केरळमधील कन्नूर जिल्ह्यात मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण आढळून आला आहे. केरळमधील कन्नूर जिल्ह्यात मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण आढळून आला आहे. तो अलीकडेच दुबईहून भारतात परतला होता. मंकीपॉक्सची लक्षणं आढळून आल्यानंतर सोमवारी संसर्गाची पुष्टी करण्यात आली आहे. सध्या त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.

संबंधित रुग्ण १३ मे रोजी दुबईहून कन्नूरला परतला होता. त्यानंतर त्याच्यात मंकीपॉक्सची लक्षणं आढळून आली. संबंधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व नातेवाईकांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. १४ जुलै रोजी कोल्लम जिल्ह्यात मंकीपॉक्सच्या पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर आज केरळमधील कन्नूर जिल्ह्यात मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे देशाची चिंता वाढली आहे.

INS Udaygiri: ‘उदयगिरी’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात; स्वीकृती दस्तावेजावर स्वाक्षरी, बघा काय आहे खासियत?

पंढरपूर वारीत अर्बन नक्षलवादी? विधानसभेत आमदार मनीषा कायंदे काय म्हणाल्या? बघा Video

कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्र सरकारची मंजुरी; प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पालिका करणार हायकोर्टात अर्ज

पुण्यातील नद्यांच्या पूररेषा नव्याने आखाव्यात; ४ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

Dombivli : ''घरी कोणीही नाही, फाशी घे''...तरुणीचा WhatsApp मेसेज अन् तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; गुन्हा दाखल