राष्ट्रीय

यंदा मान्सून सरासरीपेक्षा चांगला; स्कायमेटचा पहिला अंदाज जाहीर

भारतातील खासगी हवामान संस्था ‘स्कायमेट’ने चांगली बातमी दिली आहे. यंदाचा मान्सून मान्सून अंदाज जाहीर केला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : भारतातील खासगी हवामान संस्था ‘स्कायमेट’ने चांगली बातमी दिली आहे. यंदाचा मान्सून मान्सून अंदाज जाहीर केला आहे. मान्सूनचा येणारा हंगाम सामान्य राहील. जून ते सप्टेंबर या कालावधीत मान्सूनचा पाऊस सरासरीच्या १०३ टक्के होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये ५ टक्क्यांची वाढ किंवा घट होऊ शकते.

जून ते सप्टेंबर या कालावधीत दीर्घकालीन सरासरी ८६८.६ मिमी पाऊस पडेल, असा अंदाज ‘स्कायमेट’ने वर्तवला.

‘ला निना’ या हंगामात कमकुवत आणि संक्षिप्त असेल. ला निनाचे चिन्ह आता धुसर होत आहे. मान्सूनवर विपरीत परिणाम करण्याऱ्या ‘एल-निनो’ची शक्यता नाकारली आहे. ‘एल-निनो’ फार न्यू्ट्रल राहणार असल्यानं भारतात मान्सूनच्या पावसावेळी तो प्रभावी घटक ठरणार आहे. ‘ला निना’ कमकुवत असणं आणि ‘एल-निनो’ प्रभावी नसल्याने मान्सूनचा पाऊस चांगला होऊ शकतो. हिंदी महासागरातील स्थिती ‘एल-निनो’ प्रभावी न होण्यासाठी उपयोगी ठरु शकते. त्यामुळे मान्सूनचा पाऊस चांगला राहू शकतो, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. मान्सूनच्या पहिल्या टप्प्यापेक्षा दुसऱ्या टप्प्यात चांगला पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला आहे.

‘एल-निनो’शिवाय इतर घटक मान्सूनवर परिणाम करतात. आयओडी (इंडियन ओसियन डायपोल) सध्या प्रभावहीन असून यामुळं मान्सूनच्या सुरुवातीसाठी सकारात्मक चित्र आहे. एलनिनो दक्षिणी दोलन आणि आयओडी दोन्ही मान्सूनच्या प्रवासावर परिणाम करतात. चार महिन्यांपैकी अर्धा कालावधी झाल्यानंतर मान्सूनला अधिक वेग मिळू शकतो.

जून महिन्यात सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडू शकतो. या महिन्यात १६५.३ मिमी पावसाची नोंद होईल. जुलै महिन्यात २८०.५ मिमी पावसाची नोंद होईल, ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १०८ टक्के पाऊस होऊ शकतो. या महिन्यात २५४.९ मिमी पाऊस होऊ शकतो. सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या १०४ टक्के पावसाची नोंद होऊ शकते.

तर, १६७.९ मिमी पावसाची नोंद होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

प. दक्षिण भारतात चांगला पाऊस

पश्चिम आणि दक्षिण भारतात चांगला पाऊस होईल. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रत पुरेसा पाऊस होईल. पश्चिम घाटात प्रामुख्यानं केरळ, कर्नाटकचा किनारपट्टीचा भाग आणि गोव्यात अधिक पाऊस होईल. उत्तरेकडील राज्य आणि पर्वतीय भागात सरासरीच्या पेक्षा कमी पाऊस होईल.

ठाकरे बंधूंची यंदा 'एकत्र' दिवाळी! मनसे दीपोत्सवाचे उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते

वडिलांपेक्षा मुलगा वयाने मोठा कसा? सर्वपक्षीय शिष्टमंडळाची निवडणूक आयोगासमोर प्रश्नांची सरबत्ती, राज ठाकरेंच्या प्रश्नांनी वेधले लक्ष

IPS पूरन कुमार प्रकरणाला नवे वळण; तपास करणाऱ्या IAS अधिकाऱ्याचीही आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये गंभीर आरोप

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण : मुख्य आरोपी वीरेंद्र तावडेसह दोघांना जामीन

जैसलमेरमध्ये भीषण अपघात; खासगी बसला अचानक लागली आग, गाडी जळून खाक, ५७ जण करत होते प्रवास