राष्ट्रीय

जपानच्या भूकंपात २०० हून अधिक लोकांचा मृत्यू

जपानच्या पश्चिम किनारपट्टीला बसलेल्या ७.६ तीव्रतेच्या भूकंपानंतर बुधवारपर्यंत नवीन वर्षाच्या दिवशी २०३ इतक्या मृत्यूची नोंद झाली आहे.

Swapnil S

टोकियो : जपानच्या पश्चिम किनारपट्टीला बसलेल्या ७.६ तीव्रतेच्या भूकंपानंतर बुधवारपर्यंत नवीन वर्षाच्या दिवशी २०३ इतक्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यापैकी सात जणांचे मृत्यू हे निर्वासित शिबिरांमध्ये झाले आहेत. ते मृत्यू आजारपणामुळे वा जखमी स्थितीमुळे झाले आहेत, असे इशिकावा प्रीफेक्चरचे आपत्ती अधिकारी शिगेरू निशिमोरी म्हणाले. निशिमोरी म्हमाले की, हे सात मृत्यू थेट भूकंप, आग आणि चिखलामुळे झाले नाहीत. या भूकंपात जवळपास ३० हजारांची घरे नष्ट झाली आहेत किंवा ते असुरक्षित समजले गेले आहेत. ते शाळा आणि इतर तात्पुरत्या सुविधांमध्ये राहत होते. अगदी किरकोळ पाऊस आणि बर्फामुळेही भूस्खलन होऊ शकते जेथे एका आठवड्यापेक्षा जास्त काळ या प्रदेशात एक हजाराहून अधिक आफ्टरशॉकपासून जमीन सैल आहे. अर्धी कोसळलेली घरे सपाट होऊ शकतात.

प्रल्हाद जोशी नवे केंद्रीय शिक्षणमंत्री; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर स्वीकारला पदभार

Mumbai : शिवाजी पार्कवर तरुणाईचा महासागर! ठाकरे बंधूंच्या विजय जल्लोष सभेला हजारोंची उपस्थिती; VIDEO

'ही केवळ सुरुवात, अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे'; अभिजीत दिपकेंचा नवा व्हिडीओ चर्चेत

Mumbai Property Tax : मालमत्ता कराचे बिल आता थेट व्हॉट्सअ‍ॅपवर; BMC ची नवी डिजिटल सेवा लवकरच सुरू

वाशिममध्ये मध्यरात्री भीषण आग! काही मिनिटांत चार दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी, VIDEO