राष्ट्रीय

मुंबई हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणाला भारतात आणणार; अमेरिकेकडून प्रत्यार्पणाला मान्यता

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिकेच्या कोर्टाने भारत-अमेरिका प्रत्यार्पण करारानुसार तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे.

मुंबई २६/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणासाठी भारत सरकार अनेक वर्षांपासून प्रयत्न करत होते. २०२० मध्ये भारत सरकारने तहव्वूर राणाच्या अटक, प्रत्यार्पणासाठी अर्ज केला होता. याला जो बायडेन सरकारने त्यावेळी मंजुरी दिली होती आणि तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला होकारही दिला होता. यानंतर हे प्रकरण न्यायालयात होते. त्यानंतर आता जस्टिस जॅकलिन यांनी ४८ पानांचा आदेश देत तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली.

हल्ल्याच्या कटाची तहव्वूर राणाला माहिती

मुंबई हल्ल्याच्या ४०५ पानी आरोपपत्रात आरोपी म्हणून राणाच्या नावाचाही उल्लेख आहे. त्यानुसार राणा हा ‘आयएसआय’ आणि ‘लष्कर-ए-तोयबा’चा सदस्य आहे. आरोपपत्रानुसार, राणा हल्ल्याचा मुख्य आरोपी डेव्हिड कोलमन हेडली याला मदत करत होता. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १६६ लोकांचा मृत्यू झाला असून ३०० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये काही अमेरिकन नागरिकांचाही समावेश आहे. “तहव्वूर राणाला या कटाबद्दल माहिती होती. तहव्वूर राणाचा लहानपणीचा मित्र डेव्हिड कोलमन हेडली हा ‘लष्कर-ए-तोयबा’मध्ये होता. या दहशतवादी संघटनेसाठी डेव्हिड हेडली काम करत असल्याची माहितीही तहव्वूर राणाला होती. भारतात कट रचत असल्याची माहिती असूनही डेव्हिड हेडलीला तहव्वूर राणाने मदत केली होती,” असे कोर्टाच्या आदेशात म्हटले आहे.

आजचे राशिभविष्य, १९ ऑगस्ट २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

विदेशी निधीचा खेळ,एफसीआरएची लढाई

Shravan Special Recipe : उपवासाचा नवा बेत! वाटीभर साबुदाण्यांपासून बनवा खुसखुशीत थालीपीठ; रेसिपी आताच नोट करा

Shravan Special : उपवासाचा थकवा मिनिटांत होईल गायब; एनर्जी वाढवण्यासाठी प्या 'हे' खास ड्रिंक

सतत थकवा अन् विनाकारण वजन कमी होतंय? शरीराच्या 'या' संकेतांकडे दुर्लक्ष करू नका