डेटा सेंटर क्षमतेत मुंबई १५व्या स्थानी; ‘नाइट फ्रँक ग्लोबल डेटा सेंटर’ अहवालात आर्थिक राजधानीचा गौरव 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

डेटा सेंटर क्षमतेत मुंबई १५व्या स्थानी; ‘नाइट फ्रँक ग्लोबल डेटा सेंटर’ अहवालात आर्थिक राजधानीचा गौरव

एकूण कार्यरत डेटा सेंटर क्षमतेच्या बाबतीत मुंबईने जागतिक स्तरावर १५ वे स्थान पटकावले आहे, तर हैदराबाद २७ व्या क्रमांकावर आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : एकूण कार्यरत डेटा सेंटर क्षमतेच्या बाबतीत मुंबईने जागतिक स्तरावर १५ वे स्थान पटकावले आहे, तर हैदराबाद २७ व्या क्रमांकावर आहे.

रिअल इस्टेट सल्लागार संस्था नाइट फ्रँकने गुरुवारी ‘नाइट फ्रँक ग्लोबल डेटा सेंटर ॲटलस २०२६’ हा अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात उत्तर अमेरिका, युरोप, आशिया-पॅसिफिक, मध्य पूर्व आणि आफ्रिकेतील ३६ प्रमुख जागतिक डेटा सेंटर बाजारपेठांची तुलना करण्यात आली आहे.

मुंबईने कार्यरत डेटा सेंटर क्षमतेत जागतिक स्तरावर १५ वा, तर भविष्यातील विकास प्रकल्पांच्या (डेव्हलपमेंट पाईपलाइन) बाबतीत ११ वा क्रमांक मिळवला आहे. ७७४ मेगावॉट थेट आयटी क्षमता आणि ५ गिगावॉट पाईपलाइन क्षमतेसह, मुंबईने भारतातील प्रमुख डेटा सेंटर बाजारपेठ आणि आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील डिजिटल पायाभूत सुविधांचे एक आघाडीचे केंद्र म्हणून स्वतःला ठामपणे स्थापित केले आहे.

हैदराबाद कार्यरत क्षमतेमध्ये (१५१ मेगावॉट) जागतिक स्तरावर २७ व्या स्थानावर आहे. तर भविष्यातील विकास प्रकल्पांच्या बाबतीत ते १९ व्या क्रमांकावर (२.२ गिगावॉटपेक्षा जास्त) पोहोचले आहे.

जागतिक क्रमवारीत भारताची उपस्थिती ही गोष्ट दर्शवते की देश किती वेगाने एका धोरणात्मक डिजिटल पायाभूत सुविधांच्या गंतव्यस्थानात विकसित झाला आहे. जगातील आघाडीच्या कार्यरत बाजारपेठांमध्ये मुंबईचे स्थान हे कनेक्टिव्हिटी, एंटरप्राइज मागणी आणि क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चरमधील वर्षांनुवर्षांच्या गुंतवणुकीचे फलित आहे. भारताला जगातील टॉप १० डेटा सेंटर बाजारपेठांच्या श्रेणीत जायचे असेल तर आता आपले लक्ष केवळ मागणी निर्माण करण्यावरून पायाभूत सुविधा सक्षम करण्याकडे वळवले पाहिजे, असे शिशिर बैजल, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, नाइट फ्रँक इंडिया यांनी म्हटले आहे.

मूल्यमापनाचे निकष

अहवालात बाजारपेठांचे मूल्यमापन करण्यासाठी दोन प्रमुख निकषांचा वापर करण्यात आला आहे : लाइव्ह आयटी क्षमता सध्या कार्यरत असलेल्या डेटा सेंटर्समध्ये स्थापित केलेली प्रत्यक्ष आयटी ऊर्जा क्षमता (मेगावॉटमध्ये मोजली जाते). बांधकामाधीन असलेल्या, मान्यता मिळालेल्या आणि विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात असलेल्या प्रकल्पांची एकूण क्षमता.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

तरुणांसाठी देशनिहाय स्किल पासपोर्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

Mumbai : पाणीचोरीला बसणार आळा! टँकरच्या प्रत्येक थेंबावर BMC ची डिजिटल नजर

साखर उत्पादनात २० टक्के घट; 'विस्मा'चा अंदाज

BMC रुग्णालयांना सुरक्षा कवच; बसविणार आग प्रतिबंधक प्रणाली; खर्च २ कोटी ३६ लाख रुपये; प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात

Mumbai : पंचतारांकित हॉटेलात जेवणाच्या टेबलावर झुरळ; डॉक्टरांनी केला व्हिडिओ शेअर; FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचे वेधले लक्ष