मुरली मनोहर जोशी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; सरकार स्वतःच घोटाळ्यांमध्ये अडकल्याची टीका संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

मुरली मनोहर जोशी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; सरकार स्वतःच घोटाळ्यांमध्ये अडकल्याची टीका

बँका, व्यापारामध्ये घोटाळे होत आहेत. सरकार स्वतःचा घोटाळ्यात अडकले आहे. त्याचा मोठा परिणाम शिक्षण व विद्यार्थ्यांवर पडत आहे, अशी जोरदार टीका भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी केली आहे.

Swapnil S

लखनौ : बँका, व्यापारामध्ये घोटाळे होत आहेत. सरकार स्वतःचा घोटाळ्यात अडकले आहे. त्याचा मोठा परिणाम शिक्षण व विद्यार्थ्यांवर पडत आहे, अशी जोरदार टीका भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी केली आहे.

पेपरफुटीच्या घटनांबाबत बोलताना मुरली मनोहर जोशी यांनी ही केवळ परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी नाही असे नमूद केले. याचा संबंध समाज आणि प्रशासनातील वाढत्या भ्रष्टाचाराशीही असल्याचे त्यांनी सांगितले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात पेपरफुटीच्या घटना एवढ्या चर्चेत का नव्हत्या, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

केवळ रस्ते बांधणे हा विकासाचा निकष असू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी मजबूत शिक्षण व्यवस्थेची पायाभरणी होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

परीक्षा नव्हे, युद्धच छेडल्यासारखे वाटते

पेपरफुटी रोखण्यासाठी सरकारकडून विमान, सैन्य दल व सुरक्षांचा वापर केला जात आहे. असे वाटते की, परीक्षा नाही तर युद्धच पेटले आहे, अशी टीका जोशी यांनी केली.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Nepal Floods : मुंबईतील आठ पर्यटकांचा ठावठिकाणा लागेना; महाराष्ट्रातील ४०४ जण सुरक्षित

Mumbai : भांडुप स्टेशन परिसरातील बेकायदा स्टॉल जमीनदोस्त; मुंबईत १९७ किमी पदपथावरील अतिक्रमणे हटवली

Mumbai : स्वतःला परमेश्वर समजता का? FDA ला न्यायालयाचा सवाल; MCA तील रेस्टॉरंट्स पुन्हा सुरू होणार

मराठवाड्यातील शाळांची दुरवस्था! केवळ इमारती 'हजर'; वीज, बाके, स्वच्छतागृहे 'गैरहजर'; 'स्कूल ठीक करो'तून समोर आले वास्तव

आंदोलक आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर उपोषण मागे