आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. भास्कर राव यांचे निधन X
राष्ट्रीय

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. भास्कर राव यांचे निधन

अविभाजित आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पक्षाचे संस्थापक एन. टी. रामाराव यांच्या विरोधात १९८४ मध्ये बंड पुकारणारे ज्येष्ठ नेते नादेंडला भास्कर राव यांचे बुधवारी हैदराबाद येथे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते.

Swapnil S

हैदराबाद : अविभाजित आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पक्षाचे संस्थापक एन. टी. रामाराव यांच्या विरोधात १९८४ मध्ये बंड पुकारणारे ज्येष्ठ नेते नादेंडला भास्कर राव यांचे बुधवारी हैदराबाद येथे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. वयोमानानुसार उद्भवलेल्या आजारांमुळे त्यांच्यावर एका सुपर-स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती जनसेना पक्षाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

त्यांचे पुत्र नादेंडला मनोहर हे जनसेना पक्षाचे महत्त्वाचे नेते असून सध्या आंध्र प्रदेश सरकारमध्ये नागरी पुरवठा मंत्री म्हणून कार्यरत आहेत. नादेंडला भास्कर राव हे एन. टी. रामाराव यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. १९८४ मध्ये त्यांनी एन.टी.आर. यांच्याविरुद्ध बंड करून मुख्यमंत्रीपद मिळवले होते.

मात्र, त्यांचे हे मुख्यमंत्रीपद अवघा एक महिनाच टिकले. टीडीपीने राबवलेल्या व्यापक 'लोकशाही वाचवा' मोहिमेमुळे एन.टी.आर. पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.

UPI व्यवहारांवरील MDR शुल्काला तूर्तास ब्रेक! सणासुदीत NPCI चा मोठा निर्णय, आता कधीपासून मोजावे लागणार पैसे?

Nalasopara : लग्नाचं आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार; आणखी ७० ते ८० महिलांच्या शोषणाचाही आरोप

Punjab : फेसबुक लाइव्ह सुरू असतानाच गोळीबार; ड्रग्सविरोधी कार्यकर्ते परविंदर झोटा यांची हत्या, Video

मुंबईकरांनो, पाण्याचा गैरवापर केला तर कारवाई! २०२७ पर्यंतच्या पाणी नियोजनाचे आव्हान, १० टक्के पाणीकपात कायम

Cyber Scam : व्हॉट्सॲपवर आलेल्या 'त्या' मेसेजला 'NO' रिप्लाय करताय? बँक खातं होऊ शकतं रिकामं; पोलिसांचा इशारा