नरेंद्र मोदींना इथिओपियाचा सर्वोच्च सन्मान प्रदान  Photo : X (Narendra Modi)
राष्ट्रीय

नरेंद्र मोदींना इथिओपियाचा सर्वोच्च सन्मान प्रदान

इथिओपिया ही सिंहांची भूमी आहे, माझे गृहराज्य गुजरात हीसुद्धा सिंहांची भूमी आहे, त्यामुळे आपल्या येथे येऊन खूप आनंद होत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथिओपियाच्या संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना सांगितले. दरम्यान, 'द ग्रेट ऑनर निशाण ऑफ इथिओपिया' हा सर्वोच्च सन्मानही यावेळी मोदी यांना इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद अली यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

Swapnil S

अदिस अबाबा : इथिओपिया ही सिंहांची भूमी आहे, माझे गृहराज्य गुजरात हीसुद्धा सिंहांची भूमी आहे, त्यामुळे आपल्या येथे येऊन खूप आनंद होत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथिओपियाच्या संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना सांगितले. दरम्यान, 'द ग्रेट ऑनर निशाण ऑफ इथिओपिया' हा सर्वोच्च सन्मानही यावेळी मोदी यांना इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद अली यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

सदर सन्मान मिळविणारे मोदी हे पहिले जागतिक नेते ठरले आहेत. हा सन्मान आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे, असेही मोदी म्हणाले. मोदी मंगळवारीच इथिओपियामध्ये पोहोचले होते. हा त्यांचा पहिला दौरा आहे. अबी अहमद अली यांनी नॅशनल पॅलेसमध्ये त्यांचे औपचारिक स्वागत केले. यावेळी दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय बैठकही घेतली. मोदी यांचे भाषण संपताच खासदारांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला.

४० लाख कोविड लसी

मोदी म्हणाले, कोविड-१९ दरम्यान भारताने १५० हून अधिक देशांमध्ये औषधे आणि लसी पाठवल्या. इथिओपियाला ४० लाखांहून अधिक लसीचे डोस पुरवणे ही भारतासाठी अभिमानाची गोष्ट होती. भारतात आम्ही स्वतःची सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण केली आहे. यामुळे सरकारी सेवा जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे. आज, भारतातील जवळजवळ प्रत्येकजण पेमेंट, ओळख आणि सरकारी सेवांसाठी डिजिटल पद्धती वापरतो. जगातील अर्ध्याहून अधिक डिजिटल पेमेंट भारतात केले जातात, असेही पंतप्रधान म्हणाले

वाहतूकदारांचा राज्यव्यापी संप; बस-टॅक्सी सेवा ठप्प, शालेय विद्यार्थ्यांसह सर्वसामान्यांवर काय परिणाम?

Mumbai : India vs England सामन्यामुळे मरीन ड्राइव्ह परिसरात ट्रॅफिक अलर्ट; वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्ग जाहीर, वाचा सविस्तर

Iran vs US-Israel War : मध्यपूर्वेतील संघर्षात वाढ; भारतीय नागरिकांसाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून हेल्पलाइन क्रमांक जारी

Mumbai : वानखेडेवर India vs England सेमीफायनल; चाहत्यांसाठी मेट्रोच्या अतिरिक्त फेऱ्या, पाहा वेळापत्रक

दारूच्या वादातून वडिलांची कुऱ्हाडीने हत्या; म्हणाला "चुकून झालं", मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकून बाहेर जाऊन खाल्ली बिर्याणी