आता दिल्लीलाही मिळाले दुसरे विमानतळ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन X (narendramodi)
राष्ट्रीय

आता दिल्लीलाही मिळाले दुसरे विमानतळ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

'विकसित भारत' चे ध्येय गाठण्यासाठी देशातील १४० कोटी जनतेने जागतिक आव्हानांचा सामना करताना एकता आणि समर्पणाने काम करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. उत्तर प्रदेशातील जेवर येथे नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करताना ते बोलत होते.

Swapnil S

नोएडा : 'विकसित भारत' चे ध्येय गाठण्यासाठी देशातील १४० कोटी जनतेने जागतिक आव्हानांचा सामना करताना एकता आणि समर्पणाने काम करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. उत्तर प्रदेशातील जेवर येथे नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाचा संदर्भदेत, सरकारचे प्राधान्य भारताचे हित जोपासणे आणि 'कुटुंब व शेतकरी' सुरक्षित ठेवणे हेच असल्याचे स्पष्ट केले.

गेल्या पंतप्रधान म्हणाले की, पश्चिम आशियामध्ये महिनाभरापासून सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक संकट निर्माण झाले आहे. या कठीण काळात आपण संयम, धैर्य आणि एकजुटीने सामोरे गेले पाहिजे. हे जागतिक संकट असले तरी भारताच्या हिताला प्राधान्य देणे हीच आपली सर्वात मोठी शक्ती आहे. या परिस्थितीवर संसदेत सविस्तर चर्चा झाली असून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशीही सकारात्मक विचारविनिमय झाल्याचे त्यांनी सांगितले.

रोजगाराच्या संधी

सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात विमान प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राबवण्यात आली. आतापर्यंत १.६ कोटींहून अधिक प्रवाशांनी याचा लाभघेतला आहे. २९,००० कोटी रुपयांच्या तरतुदीसह या योजनेचा विस्तार केला जाणार असून, लहान शहरांमध्ये नवीन विमानतळ आणि सुमारे २०० हेलिपॅड्स उभारले जातील. पूर्वी ८५ टक्के विमानांना देखभालीसाठी (एमआरओ) परदेशात जावे लागायचे. आता जेवर येथे ही सुविधा उपलब्ध झाल्यामुळे भारत या क्षेत्रात स्वावलंबी होईल आणि स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील.

पायाभूत सुविधांचा महामार्ग

गेल्या ११ वर्षांत पायाभूत सुविधांवरील अर्थसंकल्पात सहा पटीने वाढ झाली असून १७ लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. १ लाख किलोमीटरहून अधिक महामार्ग बांधले गेले आहेत. वंदे भारत आणि नमो भारत यांसारख्या आधुनिक रेल्वेमुळे प्रवासाचा वेळ तासांवरून मिनिटांवर आल्याचेही त्यांनी नमूद केले.

विमानतळाची वैशिष्ट्ये

पहिल्या टप्प्यासाठी सुमारे ११,२०० कोटी रुपये खर्च, सुरुवातीला वार्षिक १.२ कोटी प्रवासी क्षमता, जी भविष्यात ७ कोटींपर्यंत वाढवता येईल, सुरुवातीला २.५ लाख मेट्रिक टन मालवाहतूक हाताळण्याची क्षमता रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि प्रादेशिक वाहतूक व्यवस्थेशी जोडलेले मल्टी-मोडल ट्रान्सपोर्ट हब ही विमानतळाची वैशिष्ट्ये आहेत. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, नागरी विमानचालन मंत्री किंजरापू राममोहन नायडू आणि इतर मान्यवर उपस्थित होते. विमानतळाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधानांनी टर्मिनलची पाहणी केली.

विरोधकांवर टीका

राजकीय पक्षांना, विशेषतः उत्तर प्रदेशातील नेत्यांना उद्देशून मोदी म्हणाले की, अशा संवेदनशील काळात बेजबाबदार विधाने करणे टाळावे. देशाचे नुकसान करणारी विधाने करून काही लोक राजकीय चर्चेत गुण मिळवू शकतील, पण जनता त्यांना कधीही माफ करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी त्यांनी समाजवादी पक्षावर टीका करताना म्हटले की, पूर्वीच्या सरकारने नोएडाला 'लुटीचे एटीएम' बनवले होते, मात्र भाजप सरकारच्या काळात ते विकासाचे इंजिन बनले आहे.

'फ्लायदुबई'च्या विमानात थरार; मुंबईकर कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत, जखमी होऊनही वाचवला १७४ प्रवाशांचा जीव

कचरा टाकाल तर दंड भराल! मुंबईत २८ दिवसांत १,३३६ जणांवर कारवाई; १८ लाख ७० हजारांचा दंड वसूल

CNG Price Hike : मुंबईकरांना महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका! CNG महागला; आजपासून मोजावे लागणार जास्त पैसे

२५ सेकंदात घराबाहेरून विद्यार्थिनीला उचललं? अपहरण प्रकरणाला आता वेगळंच वळण; तरुणीने स्वतःच व्हिडिओद्वारे केला खुलासा

Mumbai : उद्यापासून डिजिहेल्थ कनेक्ट अभियान राबवणार; १०० दिवसांत अधिकाधिक नागरिकांचे आभा कार्ड तयार करण्याचे उद्दिष्ट