राष्ट्रीय

नवज्योत सिंग सिद्धूच्या पत्नीची आपल्या पतीसाठी भावनिक पोस्ट

नवशक्ती Web Desk

काँग्रेस नेते, माजी क्रिकेटपटू आणि द कपिल शर्मा शोमध्ये आपल्या कवितेने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे नवज्योत सिंग सिद्धू सध्या तुरुंगात आहे. रोज रेड डेथ प्रकरणात ते सध्या तुरुंगवास भोगत आहेत. नवज्योत सिंग सिद्धू तुरुंगात असताना त्यांची पत्नी नवज्योत कौर यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले. स्टेज 2 कॅन्सरचे निदान झाल्यानंतर, नवज्योत कौर यांनी तुरुंगात असलेल्या आपल्या पतीसाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली. नवज्योत कौर यांनी पती नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासाठी ट्विट केले आहे. “त्यांनी कधीही केलेल्या गुन्ह्याची शिक्षा ते भोगत आहेत. मात्र, या गुन्ह्यातील दोषींना माफ करण्यात आले. मी रोज तुमची वाट पाहते. आपले दु:ख इतरांसोबत शेअर करते. मला आशा आहे की वाईट परिस्थिती सुधारेल", पुढे त्या म्हणाल्या की, "सत्य खूप शक्तिशाली आहे. पण वेळ तुमची परीक्षा घेते. कलियुग... स्टेज २च्या कॅन्सरचं निदान झाल्यामुळे तुमची वाट पाहू शकत नाही. आज माझी सर्जरी आहे. यासाठी मला कोणालाही दोष द्यायचा नाही. कारण ही देवाची इच्छा आहे. परफेक्ट” अशा नवज्योत कौर यांनी आपल्या भावना मांडल्या.

नवज्योतसिंग सिद्धू हे पटियाला सेंट्रल जेलमध्ये शिक्षा भोगत आहेत. 1988 च्या रोड रेज डेथ प्रकरणात त्यांना एक वर्षाची शिक्षा झाली होती. मे 2022 पासून ते तुरुंगात आहेत.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; तिकीट आरक्षणाच्या नियमात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार लागू

Maharastra Assembly Elections 2024: पक्षांतर्गत बंडाळीच्या धोक्यामुळे महायुती, मविआकडून सावध पवित्रा

नागरिकत्व कायद्यातील अनुच्छेद '६ए' वैध; सर्वोच्च न्यायालयाचा बहुमताने निर्वाळा