राष्ट्रीय

पैशासाठी देशाशी गद्दारी; हेरगिरीप्रकरणी नौदल कर्मचाऱ्याला अटक; पाकच्या ISI पुरवत होता गोपनीय माहिती

दिल्लीतील नौदल मुख्यालयातून एका व्यक्तीला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. विशाल यादव असे त्याचे नाव असून तो सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या एका महिला हँडलरच्या संपर्कात होता

Swapnil S

जयपूर : दिल्लीतील नौदल मुख्यालयातून एका व्यक्तीला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. विशाल यादव असे त्याचे नाव असून त्याच्यावर अनेक वर्षे पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘आयएसआय’साठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे. मे २०२५ मध्ये झालेल्या ऑपरेशन सिंदूरदरम्यान त्याच्यावर हेरगिरी केल्याचा आरोप आहे.

विशाल यादवला पैशांची गरज होती. पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ एजंटने संपर्क साधला आणि यादवने देशासोबत गद्दारी केली. विशाल यादव याने एका महिलेला भारतीय नौदल आणि इतर संरक्षण युनिट्सशी संबंधित गोपनीय माहिती पुरवली होती, असे त्याच्या मोबाइलमधील डेटावरून समोर आले आहे. ती एक पाकिस्तानी महिला होती आणि त्याची हँडलर म्हणून काम करत होती. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की विशाल यादवला ऑनलाइन गेम खेळण्याचे व्यसन होते आणि झालेले नुकसान भरून काढण्यासाठी त्याला पैशांची आवश्यकता होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आयएसआय हँडलर त्याला क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग अकाउंट्स आणि बँक अकाउंट्सद्वारे पैसे पाठवत होती.

हरयाणाचा रहिवासी विशाल यादव हा नौदल मुख्यालयात कारकून आहे. त्याला राजस्थान पोलिसांच्या गुप्तचर शाखेने अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानचे सीआयडी इंटेलिजेंस युनिट पाकिस्तानी गुप्तचर संस्थांच्या हेरगिरी कारवायांवर सतत लक्ष ठेवून होते. देखरेखीदरम्यान, विशाल यादव सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या एका महिला हँडलरच्या संपर्कात होता, असे आढळले. जयपूरमधील केंद्रीय चौकशी केंद्रात विशाल यादवची अनेक गुप्तचर संस्थांकडून संयुक्तपणे चौकशी केली जात आहे. या साखळीत आणखी कोण सामील आहे आणि आतापर्यंत किती संवेदनशील माहिती लीक झाली आहे हे शोधण्याचा प्रयत्न सुरक्षा संस्था करत आहेत. या अटकेनंतर पुन्हा एकदा हेरगिरी करणाऱ्या टोळीकडून सोशल मीडियाचा वापर समोर आला आहे. एका महिलेच्या माध्यमातून भारतात बसलेल्या लोकांकडून पाकिस्तान माहिती काढत आहे. सोशल मीडियावरील कोणत्याही संशयास्पद हालचालींबद्दल सतर्क राहण्याचे आवाहन सुरक्षा संस्थांनी लोकांना केले आहे.

महापालिकांना २७९२ कोटींचे GST भरपाई; मुंबई महापालिकेला सर्वाधिक १२९४ कोटी

Mumbai : धक्कादायक! SNDT कॉलेजच्या कराटे प्रशिक्षकावर अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्काराचा आरोप; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; पुण्यातील घटनेचा VIDEO व्हायरल

Thane : 'स्वस्त घर' आणि शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने २.९७ कोटींची फसवणूक; तिघांविरोधात तक्रार

मुंबईला मलेरिया डेंग्यूचा घट्ट विळखा; तीन महिन्यांत मलेरियाचे साडेचार हजार रुग्ण