बिगर बँकिंग वित्त कंपन्यांचे शैक्षणिक कर्ज उत्पन्न वाढणार 
राष्ट्रीय

बिगर बँकिंग वित्त कंपन्यांचे शैक्षणिक कर्ज उत्पन्न वाढणार

अमेरिकेला केंद्रस्थानी ठेवून दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक कर्जांच्या मागणीवर धोरणात्मक अनिश्चिततेचा परिणाम झाला आहे. असे असूनही इतर देशांमधील शिक्षणासाठी वाढलेल्या कर्जांमुळे चालू आर्थिक वर्षात नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांच्या शैक्षणिक कर्ज व्यवस्थापन मालमत्तेतील वाढ २० टक्क्यांवर स्थिर राहण्याचा अंदाज आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : अमेरिकेला केंद्रस्थानी ठेवून दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक कर्जांच्या मागणीवर धोरणात्मक अनिश्चिततेचा परिणाम झाला आहे. असे असूनही इतर देशांमधील शिक्षणासाठी वाढलेल्या कर्जांमुळे चालू आर्थिक वर्षात नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांच्या शैक्षणिक कर्ज व्यवस्थापन मालमत्तेतील वाढ २० टक्क्यांवर स्थिर राहण्याचा अंदाज आहे.

‘क्रिसिल रेटिंग्ज’ने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती दिली आहे. अहवालानुसार, मोरेटोरियम (कर्ज फेडणीची तात्पुरती सवलत) संपवून नियमित परतफेडीच्या टप्प्यात येणाऱ्या कर्जांचे प्रमाण वाढले असले, तरी मालमत्तेची गुणवत्ता आतापर्यंत मजबूत राहिली असून ती स्थिर राहण्याची अपेक्षा आहे.

मोरेटोरियम कालावधी आणि परतफेडीचे नियम

बिगर बँकिंग वित्त कंपन्या सामान्यतः अभ्यासक्रमाच्या कालावधीनुसार शैक्षणिक कर्जाची रचना करतात.

  • मोरेटोरियम कालावधी : अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांना कर्ज फेडण्यापासून सूट दिली जाते.

  • नियमित हप्ते : अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर आणि विद्यार्थ्याला नोकरी मिळाल्यानंतर कर्जदाराच्या उत्पन्नाच्या क्षमतेनुसार समान मासिक हप्ते सुरू होतात.

एकूण कर्जपुस्तकाचा मोठा हिस्सा अजूनही कराराच्या मोरेटोरियम कालावधीत असल्याने मोठ्या परतफेड चक्रामध्ये या पोर्टफोलिओची कामगिरी कशी राहील याची पूर्ण चाचणी होणे अद्याप बाकी आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Video : मित्रानेच केला गेम! फेसबुक किंग बंटी दीक्षितचा निर्घृण खून; आधी कारने स्कूटरला उडवलं, नंतर...

सातारा जिल्हा बँकेच्या नऊ जागा बिनविरोध; दहा वर्षांच्या संचालकपदाचा दिग्गजांना फटका, निवडणुकीत मोठी माघार

Wardha : पोलिसांसमोरच आरोपीने महिला डॉक्टरला लगावली जोरदार थप्पड; डॉक्टरांकडून कारवाईची मागणी, CCTV व्हिडीओ व्हायरल

Mumbai : भुलेश्वरमध्ये जुन्या भूमिगत केबल्स बदलणार; २०० कोटी रुपये खर्च, बेस्टचा निर्णय

Mumbai : कथित शिकारीप्रकरणी चितेच्या राखेची तपासणी; दोन छर्रे आणि अर्धवट जळालेला मोबाईल जप्त, दोघांना कोठडी