राष्ट्रीय

नीरज चोप्राला लेफ्टनंट कर्नल मानद उपाधी

ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याला हिंदुस्थानी सैन्यात पदोन्नती मिळाली आहे. त्याची लेफ्टनंट कर्नल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याला हिंदुस्थानी सैन्यात पदोन्नती मिळाली आहे. त्याची लेफ्टनंट कर्नल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी दिल्लीत झालेल्या एका समारंभात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी त्याला मानद उपाधी प्रदान केली. यावेळी नीरज चोप्रा याची आई सरोज देवी, वडील सतीश चोप्रा, काका भीम चोप्रा आणि पत्नी हिमानी मोर हेही उपस्थित होते.

नीरज चोप्रा २६ ऑगस्ट २०१६ रोजी नायब सुभेदार म्हणून सैन्यात रुजू झाला. २०२१ मध्ये त्याला सुभेदार म्हणून बढती देण्यात आली. टोकियो ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर त्याला सैन्याने परम विशिष्ट सेवा पदक प्रदान केले. २०२२ मध्ये नीरज याला सुभेदार मेजर म्हणून बढती देण्यात आली होती.

दरम्यान, नीरज चोप्रा हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा भालाफेकपटू आहे. त्याने सलग दोन ऑलिंपिक खेळांमध्ये देशासाठी पदके जिंकली आहेत. नीरजने पॅरिस ऑलिंपिकमध्ये रौप्य आणि टोकियो ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. याव्यतिरिक्त, त्याने जागतिक अजिंक्यपद स्पर्धा, आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल खेळ यासारख्या जागतिक दर्जाच्या स्पर्धांमध्ये हिंदुस्थानसाठी सुवर्णपदके जिंकली आहेत.

Video : नेपाळमध्ये महाप्रलय! भोटे कोशी नदीला अचानक महापूर; अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती, किमान १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता

शासकीय, खासगी, धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिट; तातडीने कार्यवाही करण्याचे आरोग्य मंत्र्यांचे निर्देश, राज्य सरकार ॲक्शन मोडवर

Pune : भटक्या कुत्र्याचा महिलेवर हल्ला; तोल जाताच बाळ पडलं खाली, Video व्हायरल

Mumbai : निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता; राजावाडी रुग्णालयातील अन्य डॉक्टरांवर ताण, दिवसाला ५०० रुग्णांची तपासणी

Madhya Pradesh : भाजप आमदाराने अग्निशमन दलाच्या वाहनाने धुतली स्वतःची कार; VIDEO व्हायरल