(संग्रहित छायाचित्र) 
राष्ट्रीय

‘एनआयए’ चौकशीची शिफारस,खलिस्तान समर्थक संघटनेकडून पैसे घेतल्याचा केजरीवालांवर आरोप!

Swapnil S

नवी दिल्ली : दिल्ली मद्य घोटाळ्यात अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी केजरीवाल यांच्याविरोधात ‘एनआयए’ चौकशीची शिफारस केली आहे.

खलिस्तान समर्थक संघटना ‘सिख फॉर जस्टिस’कडून निधी घेतल्याचा आरोप केजरीवाल यांच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी उपराज्यपालांनी केंद्रीय गृह खात्याला पत्र लिहून ही मागणी केली. हे आरोप एका मुख्यमंत्र्यांच्या विरोधात असून निधी देणारी संघटना भारतात बंदी घातलेली आहे. हे प्रकरण लाखो डॉलर्सच्या कथित निधी प्रकरणाशी संबंधित आहे. तक्रारदाराने केलेल्या आरोपांबाबत न्यायवैज्ञानिक तपासासहित अन्य तपास गरजेचा आहे.

‘आप’ला मिळाली १६ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची मदत

देवेंद्र पाल भुल्लर यांच्या सुटकेसाठी खलिस्तानी संघटना ‘सिख फॉर जस्टीस’कडून १६ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा निधी ‘आप’ला मिळाल्याचा आरोप वर्ल्ड हिंदू फेडरेशन इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस आशू मोंगिया व ‘आप’चे माजी कार्यकर्ता मुनीषकुमार रायजादा यांनी केला आहे. ‘आप’ला २०१४ ते २०२२ दरम्यान खलिस्तानी संघटनेकडून ही १६ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची मदत मिळाली होती, असे त्यांनी म्हटले आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त